देश तोडण्याची काँग्रेस खासदाराची भाषा; मल्लिकार्जुन खर्गेंकडून राज्यसभेत निषेध, पण कारवाईत हात आखडता!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून दक्षिण भारताला स्वतंत्र देश मागावा लागेल, अशी फुटीरतावादी भाषा काँग्रेसचे बंगलोरचे खासदार डी. के. सुरेश यांच्या तोंडी आली त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली. काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाच्या खासदाराने देश तोडण्याची भाषा वापरावी याचा सर्वत्र निषेध झाला. शेवटी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना राज्यसभेत डी. के. सुरेश यांच्या वक्तव्याचा निषेध करावा लागला. पण तोंडी निषेध करण्यापलीकडे जाऊन मल्लिकार्जुन खरे यांनी डी. के. सुरेश यांच्याविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई करण्याच्या वेळी मात्र हात आखडता घेतला. Protest by Mallikarjun Kharge in Rajya Sabha

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अंतिम अर्थसंकल्प सादर केला. त्यामध्ये त्यांनी दक्षिण भारतावर अन्याय केला, असा कांगावा करत काँग्रेसचे खासदार डी. के. सुरेश यांनी दक्षिण भारतातून केंद्र सरकारला तब्बल 4 लाख कोटींचा महसूल जातो, पण केंद्र सरकार दक्षिण भारताला काहीही देत नाही, असा आरोप केला. पण एवढाच आरोप करून ते थांबले नाहीत, तर त्यापलीकडे जाऊन दक्षिण भारताला स्वतंत्र देश निर्माण करावा लागेल, अशी फुटीरतावादी भाषा त्यांनी वापरली.

काँग्रेस खासदाराच्या तोंडी ही फुटीरतावादी भाषा ऐकून सोशल मीडियावर प्रचंड संताप उसळला. केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका करणे ठीक, दक्षिण भारतावर अन्याय झाला अशी भाषा वापरायलाही हरकत नाही. परंतु थेट दक्षिण भारताचा स्वतंत्र देश मागण्याचा फुटीरतावाद कशासाठी??, असा सवाल अनेकांनी केला. त्यामुळे काँग्रेस सारखा राष्ट्रीय पक्ष अडचणीत आला.

आज त्यावर राज्यसभेमध्ये तिखट चर्चा झाली. राज्यसभेचे नेते मंत्री पियुष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्यावर प्रत्युत्तर देताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी डी. के. सुरेश यांच्या फुटीरतावादी भाषेचा निषेध केला, पण मूळातच त्यांनी तशी भाषा वापरली नसल्याचा दावा केला. काँग्रेसच्या दोन पंतप्रधानांनी देशासाठी बलिदान केले. काँग्रेस कधीच फुटीरतावादाची भाषा मान्य करणार नाही. कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत हा संपूर्ण देश एक आहे हीच आमची भूमिका आहे, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. परंतु प्रत्यक्षात डीके सुरेश यांच्यावर कारवाई करण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी हात आखडता घेतला. सुरेश यांच्यावर अद्याप काँग्रेसने कोणतीही कारवाई केलेली नाही. उलट सुरेश यांनी फुटीरतावादाचे विधान केलेच नसल्याचा दावा मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.

– काँग्रेसला कर्नाटकात फुटीची भीती

त्यामागे काँग्रेसचे दक्षिणेतले राजकारण दडले असल्याचे बोलले जाते. डी. के. सुरेश हे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचे बंधू आहेत. त्यांच्यावर काँग्रेसने शिस्तभंगाची अथवा कुठलीही कायदेशीर कारवाई केली, तर शिवकुमार यांना पक्षातून फुटून जाण्याचे निमित्त मिळेल आणि ते भाजपबरोबर जाऊन महाराष्ट्रातला प्रयोग रिपीट करतील, याची काँग्रेस हायकमांडला भीती वाटत आहे. य् भीतीपोटी डी. के. सुरेश यांच्या फुटीर वक्तव्यानंतरही त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई करण्यास काँग्रेस नेते धजावत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आहे.

Protest by Mallikarjun Kharge in Rajya Sabha

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात