वृत्तसंस्था
नवी दिल्ली : मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी जगभरातील युद्धे थांबविण्यासाठी एक आयोग तयार करण्याचा प्रस्ताव दिला आहे. जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या या आयोगामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, पोप फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांची नावे समाविष्ट करावीत, असेही त्यांचे म्हणणे आहे.Proposal of Modi’s name for peace in the world President of Mexico said – a commission should be formed to prevent war, Pope Francis should also be included in it
यासाठी ते UN (संयुक्त राष्ट्र) कडे लेखी प्रस्तावही सादर करणार असल्याचे ओब्राडोर यांनी सांगितले. ओब्राडोर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
आयोग 5 वर्षांसाठी शांतता तोडगा काढेल
ओब्राडोर म्हणाले- मला आशा आहे की याविषयीची माहिती प्रसारित करण्यात मीडिया आम्हाला मदत करेल. जगभरातील युद्धे थांबवण्यासाठी आणि किमान 5 वर्षांसाठी शांतता करारावर पोहोचण्याचा प्रस्ताव सादर करणे हे आयोगाचे लक्ष्य असेल.
चीन, रशिया आणि अमेरिकेला शांतता चर्चेचे निमंत्रण
युद्ध संपवण्याचे आवाहन करत मेक्सिकन राष्ट्राध्यक्षांनी चीन, रशिया आणि अमेरिकेला शांतता चर्चेसाठी आमंत्रित केले. तिन्ही देश त्यांचा प्रस्ताव मान्य करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. ओब्राडोर म्हणाले – कोणीतरी त्यांना सांगावे की या देशांमधील परस्पर संघर्षामुळे जगाला एका वर्षापेक्षा कमी कालावधीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. गरिबी, महागाई वाढली असून जग अन्न संकटाचा सामना करत आहे. यामुळे जगभरात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
ओब्राडोर यांच्या मते, प्रस्तावित आयोग तैवान, इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या बाबतीत करार होण्यास मदत करेल. यामुळे भविष्यातील संघर्ष टाळण्यास मदत होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App