देशातल्या सगळ्या पलटूमारांसाठी नितीश कुमार “मार्गदर्शक”; आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांचा टोला!!


वृत्तसंस्था

गुवाहाटी : नितीश कुमार यांनी बिहारमध्ये भाजपला सत्तेतून बाहेर काढल्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे आणि तो वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त होत आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांनी नितीश कुमार यांच्या बदललेल्या भूमिकेवरून जोरदार टोला हाणला आहे. देशभरातल्या पलटूमारांसाठी नितीश कुमार हे सगळ्यात मोठे “मार्गदर्शक” आहेत, अशा शब्दांमध्ये त्यांनी वाभाडे काढले आहेत. Nitish Kumar “Guide” for all the platooners in the country; Assam Chief Minister Hemant Vishwasharma’s gang!!

जनतेने नाकारलेल्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना नितीश कुमार यांनी उपमुख्यमंत्री जरूर केले आहे, पण नितीश कुमार यांची गॅरंटी कोण घेणार? येत्या सहा आठ महिन्यांमध्ये ते परत पलटुमार होणार नाहीत याची खात्री कोण देणार?, असा खोचक सवालही हेमंत विश्वशर्मा यांनी केला आहे.

खुद्द हेमंत विश्व शर्मा हे काँग्रेस मधून भाजपमध्ये आले आहेत. हेच ते हेमंत विश्व शर्मा आहेत, जे काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना भेटायला 10 जनपथ मध्ये गेले होते, तेव्हा त्यांच्याशी बोलण्याऐवजी आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देणे ऐवजी राहुल गांधी हे कुत्र्याला बिस्किटे खाऊ घालण्यात मग्न होते. ही स्टोरी स्वतः हेमंत विश्व शर्मा यांनी त्यावेळी पत्रकार परिषदेत सांगून काँग्रेसचा त्याग केला होता.
आपल्या पक्ष त्यागाचा देखील हेमंत विश्वशर्मा यांनी उल्लेख केला आहे. आम्ही पक्ष सोडला. पण त्यासाठी विशिष्ट कारणे होती आणि आम्ही दर सहा आठ महिन्यांनी पलटूमारी केली नाही हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.

 येडीयुरोप्पांनी वाढविले कर्नाटक भाजपचे टेन्शन

दुसरीकडे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी एक वक्तव्य करून भाजपचे कर्नाटकातले टेन्शन वाढवले आहे. बिहार मधल्या घडामोडींवरून कर्नाटकातल्या राजकीय परिस्थितीवर कोणी भाष्य करू नये. कारण कर्नाटकात कोणीही मुख्यमंत्री बदलाची मागणी केलेली नाही. मुख्यमंत्री बदलाच्या अफवा पसरल्या आहेत, असे वक्तव्य येडीयुरप्पा यांनी केले आहे. स्वतः येडीयुरप्पा यांनीच मुख्यमंत्री बदलाचा विषय काढल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येडियुरप्पा यांना वयाच्या 75 वर्षाचा निकष लावून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हायला भाग पाडले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांची निवड केली. परंतु त्या वेळेपासून येडीयुरप्पा नाराजच आहेत. शिवाय त्यांच्या मुलाला देखील मुख्यमंत्री बोम्मई हे राज्याच्या कॅबिनेटमध्ये स्थान देत नाहीत म्हणूनही ते नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर येडीयुरप्पा यांनी कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाचा विषय काढून भाजपचे टेन्शन वाढवले आहे.

Nitish Kumar “Guide” for all the platooners in the country; Assam Chief Minister Hemant Vishwasharma’s gang!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था