प्रियांका उत्तर प्रदेशात राजकीय एपिसोड मागून एपिसोड घडवताहेत; पण बाकीचे पक्ष काँग्रेसकडे लक्ष का देत नाहीत??

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : लखीमपुर हिंसाचाराच्या मुद्यापाठोपाठ प्रियांका गांधी यांनी आग्र्यामध्ये घडलेल्या पोलीस कोठडीतील अरुण वाल्मिकी या युवकाच्या मृत्यूचा मुद्दा उचलून धरला आहे. उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने त्यांना आधी लखीमपुर येथे जाण्यापासून रोखले. आज त्यांना आग्र्याला जाण्यापासून रोखले.Priyanka is making episodes after political episodes in Uttar Pradesh; But why don’t other parties pay attention to Congress

लखीमपुर हिंसाचार आणि आग्र्यातील अरुण वाल्मिकी याच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यू हे दोन्ही गंभीर मुद्दे आहेत. राज्य सरकारने याविषयी कठोर कारवाई केलीच पाहिजे. यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. परंतु प्रियांका गांधी यांच्यासारख्या बड्या काँग्रेस नेत्याने हे मुद्दे उचलून धरल्यानंतर बाकीचे राजकीय पक्ष त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष का करीत आहेत किंवा एकूणच काँग्रेसची राजकीय दखल ते का घेत नाहीत या मुद्द्यांवर चर्चा होणे महत्त्वाचे आहे.



एकीकडे उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांच्या अटकेचा मुद्दा गाजत असताना त्याच दिवशी समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि सुहेल देव समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर हे युती करतात. अखिलेश यादव काँग्रेसकडे राजकीय दृष्ट्या ढुंकूनही बघत नाहीत. बहुजन समाज पक्ष आणि ओमप्रकाश राजभर यांचा यांचा छोटा पक्षदेखील काँग्रेसला राजकीय दृष्ट्या विचारात घेत नाही. एक प्रकारे हे भाजपवर डागताना काँग्रेसलाच एकाकी पाडणे नव्हे काय…??

प्रियांका गांधी यांनी राजकीय दृष्ट्या दोन संवेदनशील मुद्यांना हात घातला आहे. तरी देखील काँग्रेस इतर पक्षांसाठी दखलपात्र उरली नाही काय? हा पक्ष संघटनेच्या दृष्टीने चिंतेचा विषय असू नये का? याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रियांका गांधी यांचे राजकीय मुद्दे उचलून धरण्याचे टाइमिंग योग्य आहे. काँग्रेससाठी त्याचा राजकीय लाभ देखील होऊ शकतो. परंतु फक्त तेवढ्यानेच काँग्रेसची राजकीय नौका विधानसभेच्या निवडणुकीत पार होईल अशी अपेक्षा करणे राजकीय भाबडेपणाचे ठरेल.

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस संघटनात्मक पातळीवर रसातळाला जाऊन पोहोचल्याचे कठोर वास्तव आहे. प्रियांका गांधी त्या वास्तवावर मात कशी करणार?, हा मुख्य प्रश्न आहे. यासाठी काँग्रेसला समविचारी पक्षांची युती किंवा आघाडी करणे भाग आहे.

पण बाकीचे कोणतेच पक्ष समविचारी असले तरी काँग्रेसला जवळ करत नाहीत हा पक्षाच्या दृष्टीने गंभीर आणि घातक राजकीय पेचप्रसंग आहे. किंबहुना या पेचप्रसंग सोडवणूकीत तर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा राजकीय परफॉर्मन्स  नेमका कसा राहतो याचे उत्तर दडलेले आहे.

Priyanka is making episodes after political episodes in Uttar Pradesh; But why don’t other parties pay attention to Congress

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात