‘सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेही काम नाही, शरद पवारच मुख्यमंत्र्याचे काम करतात’, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची टीका

Central Minister MP Kapil Patil said Sharad Pawar is acting as Maharashtra CM

Central Minister MP Kapil Patil : काही करुन सत्ता टिकवून ठेवायची या एकमेव उद्देशाने शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यांचे सर्वोच्च नेते शरद पवार ‘राष्ट्रीय नेते’ असल्याचे सांगितले जाते. पण ते राज्यात मुख्यमंत्री म्हणूनच काम करत आहेत का अशी शंका आहे. केंद्रीय मंत्री, खासदार कपिल पाटील यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. Central Minister MP Kapil Patil said Sharad Pawar is acting as Maharashtra CM


प्रतिनिधी

मुंबई : “देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर बसूनही महाराष्ट्रासाठी कार्यरत आहेत. सहाजीकच आपण मुख्यमंत्री असल्याची भावना त्यांच्या मनात आली तर त्यात गैर नाही. सध्याच्या मुख्यमंत्र्यांकडे कोणतेच काम नाही. त्यांचे काम शरद पवारच करत आहेत,” अशी टीका केंद्रीय पंचायतराजमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

ठाण्यात आयोजित भाजपाच्या ओबीसी जागर अभियानत पाटील बोलत होते. यावेळी त्यांनी महाआघाडी सरकावर जोरदार टीकास्त्र सोडले. ठाकरे-पवार सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण अजूनही दिलेले नाही. मराठा, धनगरांना आरक्षण मिळालेले नाही. परंतु आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी केवळ केंद्राकडे बोट दाखवित टाळाटाळ करण्याचे काम महाआघाडी सरकार करीत असल्याचे पाटील म्हणाले. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी केंद्राने राज्य सरकारला अधिकार दिले आहेत. मात्र हे आरक्षण देण्याऐवजी, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ सरकार कसे टिकेल हाच प्रयत्न सत्तेतील तिन्ही पक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

महाआघाडी सरकार सत्तेत आल्यापासून नुसता गोंधळ घातला जात आहे. तो गोंधळ कमी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करीत आहेत. भविष्यात कितीही पक्ष एकत्र आले तरी देखील यापुढे महाराष्ट्रात भाजपचेच सरकार येणार असून फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात एमएमआरडीएकडून 145 कोटी रूपयांचा निधी ठाणे जिल्ह्याला मिळाला होता. ठाकरे-पवार सरकारकडून निधी दिला जात नसून त्यासाठी वारंवार खेटे घालावे लागत आहेत, असे पाटील म्हणाले.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढीव दराबाबत पाटील यांनी ठाकरे-पवार सरकारवर टीका केली. ते म्हणाले, “पेट्रोल, डिझेल दर वाढले म्हणून केंद्राकडे बोट दाखविले जाते. मात्र क्रुड ऑईलचे दर वाढल्याने ही दरवाढ होत असते हे महाविकास आघाडी सरकाराला माहित नाही का?” चीनला बॉर्डर पासून दोन किलोमीटर मागे ढकलले, पाकीस्तानात घुसून देशाने तिरंगा फडकवला, ३७० कलम हटविले ही देशहिताची कामे विरोधकांना दिसत नाहीत का, असा सवालही त्यांनी केला.

Central Minister MP Kapil Patil said Sharad Pawar is acting as Maharashtra CM

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात