वृत्तसंस्था
चंदिगड : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज हरियाणा आणि पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते जनतेला महत्त्वाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दोन्ही राज्यांत प्रत्येकी एका रुग्णालयाचे उद्घाटन करतील. पीएमओने दिलेल्या माहितीत, पीएम मोदी हरियाणाच्या फरिदाबादमध्ये ‘अमृता हॉस्पिटल’ आणि त्यानंतर पंजाबच्या मोहालीच्या न्यू चंदीगडमध्ये ‘होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’चे उद्घाटन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.Prime Minister Narendra Modi on Haryana-Punjab tour today: Inauguration of major hospitals, tight security arrangements
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता हरियाणातील फरिदाबादला पोहोचणार आहेत. जिथे अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन करणार आहेत. यानंतर पीएम मोदी दुपारी 02:15 वाजता मोहालीमध्ये ‘होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर’चे उद्घाटन करतील.
पंतप्रधान मोदी करणार अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन
हरियाणाच्या फरिदाबादमध्ये 2,600 बेडच्या अमृता हॉस्पिटलचे उद्घाटन पंतप्रधान मोदी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याद्वारे फरिदाबादच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना आधुनिक औषधी पुरविण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे रुग्णालय माता अमृतानंदमयी मठाकडून चालवले जात आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी 6 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
पंजाबमध्येही रुग्णालयाचे उद्घाटन करणार
हरियाणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबला जाणार आहेत, जिथे ते मोहालीमध्ये ‘होमी भाभा कॅन्सर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’चे उद्घाटन करतील. हे टाटा मेमोरियल सेंटरने 660 कोटी रुपये खर्चून बांधले आहे. या रुग्णालयात रुग्णांना शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी आणि मेडिकल ऑन्कोलॉजी- केमोथेरपी, इम्युनोथेरपी आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटची सुविधा दिली जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App