पारंपरिकदृष्ट्या पुरुषांचे वर्चस्व मानले गेलेल्या संस्कृत महापरीक्षेत दोन विद्यार्थिनींचे यश!!


कल्याणी हर्डीकर, ऋतुजा कुलकर्णी, मंजुनाथ होळळा, प्रियव्रत पाटील यांचे यश

प्रतिनिधी

नाशिक : संस्कृत अध्ययनात पारंपरिक दृष्ट्या पुरुषांचे वर्चस्व मानले गेलेल्या महापरीक्षेत प्रथमच दोन विद्यार्थिनींनी यश मिळवले आहे. कल्याणी तन्मय हर्डीकर आणि ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी अशी या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. आद्य शंकराचार्य स्थापित शृंगेरी शारदापीठात झालेल्या संस्कृत मौखिक महापरीक्षेत या विद्यार्थिनींसह मंजुनाथ होळ्ळा आणि प्रियव्रत देवव्रत पाटील यांनी देखील या महापरिक्षेत यश प्राप्त केले आहे. The success of two female students in the traditionally male-dominated Sanskrit Mahaparikas

पारंपरिक अध्ययन पद्धतीने न्याय, वेदांत, व्याकरण, मीमांसा तथा गणित या विषयांची परीक्षा क्षीरसागर महाराज दत्त देवस्थान, संस्था अहमदनगर घेत असते. सन 2013 पासून ही परीक्षा सुरू आहे. गुरुगृही राहून पूर्णपणे पारंपारिक पद्धतीने शास्त्राध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यास ही महापरीक्षा देता येते. आत्तापर्यंत ही महापरीक्षा पुरुषांची मक्तेदारी मानली गेली होती. परंतु, आता प्रथमच सन 2022 मध्ये ही परीक्षा विद्यार्थिनींनी दिली असून यामध्ये वर उल्लेख केलेल्या कल्याणी तन्मय हर्डीकर आणि ऋतुजा बाळकृष्ण कुलकर्णी यांनी यश मिळविले आहे.

पारंपरिक पद्धतीच्या अध्ययन पद्धतीत दर सहा महिन्यांनी परीक्षेचे आयोजन केले जाते. याला ष्णमासिक परीक्षा असे म्हटले जाते. ही परीक्षा मौखिक आणि लेखी असते. अशा 14 परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर मगच महापरीक्षा देण्यास विद्यार्थी पात्र होतो.

– महापरीक्षेसाठी महाअभ्यास

योग्यतेनुसार विविध स्तरांवर विविध ग्रंथांचा अभ्यास या महापरीक्षेसाठी करावा लागतो. यामध्ये न्यायशास्त्राचे 19, व्याकरणाचे 8, मीमांसेचे 9, वेदांताचे 12 आणि गणिताचे 13 अशा ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो. आपल्या पूर्ण छात्र जीवनात एक विद्यार्थी एक किंवा दोन विषयांचे पूर्ण अध्ययन करू शकतो. 14 परीक्षा पूर्ण घेतल्यानंतर महापरीक्षा पूर्वनियोजनानुसार जगद्गुरु शृंगेरी शंकराचार्य संबंधित विद्यार्थ्यांची महापरीक्षा घेतात. या परीक्षेत चार वर्षांचा पाठ्यक्रम तयार करून त्यावर आधारित ही प्रश्न विचारले जातात ही प्रमुख ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने मौखिक घेतली जाते.

गेली दोन वर्षे कोरोना संक्रमणामुळे या परीक्षेत खंड पडला होता. सन 2022 मध्ये या परीक्षेत तीन विद्यार्थिनी आणि दोन विद्यार्थी यांनी भाग घेतला आणि विशेष गौरवाचा गौरवाची बाब ही की यावर्षीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी गोव्यातील पाठशाळेमधूनच सहभागी झाले होते 16 आणि 17 ऑगस्ट 2022 रोजी शृंगेरीचे शंकराचार्य श्री विधुशेखर भारती यांच्या दिव्य सानिध्यात ही परीक्षा झाली. पाच पैकी चार विद्यार्थिनी विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीबद्दल शंकराचार्यांनी अतिशय समाधान व्यक्त केले. महापरीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम इतकेच नाही तर या परीक्षेतील महिलांचा यशस्वी सहभाग याविषयी शंकराचार्यांनी आनंद व्यक्त केला. दत्त देवस्थानचे विश्वस्त श्री. संजय क्षीरसागर या परीक्षा काळात शृंगेरी येथे उपस्थित होते यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना क्षीरसागर महाराजांच्या जन्मदिवशी 2023 च्या फेब्रुवारी महिन्यात पदवी प्रदान करण्यात येईल.

संस्कृत महापरीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय स्तरावर आधीच विविध परीक्षांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. या परीक्षेत यशस्वी झालेला विद्यार्थी सुब्रह्मण्य मंजुनाथ होळ्ळा उडुपी परिसरातून रिवण गोवा श्रीविद्या पाठशाळेत येऊन सहा वर्षात त्याने मीमांसा शास्त्राचा अभ्यास पूर्ण केला आहे, तर याच पाठशाळेत न्यायशास्त्राचा अभ्यास करून प्रियव्रत देवव्रत पाटील याने महापरीक्षेत अत्युत्तम श्रेणी मिळवली आहे. मंजुनाथने प्रथमश्रेणीत महापरीक्षा उत्तीर्ण केली आहे.

The success of two female students in the traditionally male-dominated Sanskrit Mahaparikas

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात