काँग्रेसचा सगळ्यांना “समान न्याय”, जनतेला लुटण्यात भेदभाव नाय; पंतप्रधान मोदींचे अजमेर मधून शरसंधान!!

वृत्तसंस्था

अजमेर : काँग्रेस नेहमी गरिबांची भाषा बोलते. काँग्रेस सगळ्यांना “समान न्यायाने” वागणूक देते, हे खरेच आहे. कारण जेव्हा लुटायची वेळ येते, तेव्हा काँग्रेस अजिबात भेदभाव करत नाही. देशातल्या गरीब, वंचित, पीडित, दलित, शोषित, आदिवासी, अल्पसंख्यांक या सर्वांना काँग्रेस “समान न्यायाने” लुटते, अशा खोचक शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेसवर शरसंधान साधले.

केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानंतर प्रथमच जाहीर सभेला मोदींनी संबोधित केले, ते राजस्थानच्या अजमेर मधून. या जाहीर सभेपूर्वी पंतप्रधानांनी पुष्कर मध्ये जाऊन ब्रह्मदेवाचे दर्शन घेतले. त्यानंतर अजमेर मधल्या महा रॅलीला संबोधित केले. या रॅलीच्या संबोधनापासून भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी याच सभेत 22500 हजार कोटी रुपयांच्या जलजीवन मिशनचा शुभारंभ केला. राजस्थानातल्या 15 लाख नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

या रॅलीला माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा प्रदेश अध्यक्ष खासदार सी. पी. जोशी, भाजप प्रभारी अरुण सिंह, सहप्रभारी विजया रहाटकर आदी नेते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी म्हणाले, काँग्रेसला फक्त खोटे बोलायला जमते. कागदावर 500 कोटी रुपये लिहून ते निवृत्त जवानांची फसवणूक करू शकतात. त्यांना जुन्या पेन्शनच्या आश्वासनाने भुलवू शकतात. पण काँग्रेस एक बाबतीत “खरे” बोलते. ती सगळ्यांचा समान न्याय करते. कारण जेव्हा लूट करण्याची वेळ येते, तेव्हा काँग्रेस सर्व भारतीय नागरिकांना “समान न्यायाने” वागवते. गरीब, शोषित, वंचित, दलित, पीडित, आदिवासी, अल्पसंख्यांक सर्वांचे सर्वांना समान न्यायाने लुटते, अशा खोचक शब्दांत पंतप्रधानांनी काँग्रेसचे वाभाडे काढले.

राजस्थानात जनतेने गेल्या 5 वर्षांपूर्वी काँग्रेसला पूर्ण बहुमत दिले होते. पण काँग्रेसने जनसेवेत आपली शक्ती खर्च करण्यापेक्षा त्यांचे मुख्यमंत्री विरुद्ध त्यांचेच आमदार या लढाईत वेळ घालवला आणि त्यामुळे जनतेचे अपरंपार नुकसान झाले. दिल्लीतून केंद्र सरकारने पाठवलेल्या पैशाचा इथले राज्य सरकार नीट विनियोगच करू शकले नाही. आपापसातल्या भांडणांमध्येच तो पैसा त्यांनी वाया घालवला किंवा सरकारच्या तिजोरीत तसाच पडून ठेवला, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला.

Prime Minister Modi’s visit from Ajmer

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात