कुस्तीगीर आंदोलनात शेतकरी आंदोलनाचे रिपिटेशन; वाचा दिल्ली – कोलकात्ता कनेक्शन!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, दिनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी चालविलेल्या आंदोलनात नवी दिल्ली राजधानी दिल्लीत गेल्या वर्षी झालेल्या कृषी आंदोलनाचे रिपीटेशन होताना दिसत आहे. कृषी आंदोलन ज्या वळणा आणि वळश्यांनी गेले, त्याच वळणांनी कुस्तीगीरांचे आंदोलन चालल्याचे दिसत आहे.Wrestlers agitation taking turn of farmers agitation

कुस्तीगीर आंदोलनाला हळूहळू दिल्ली बाहेरून पाठिंबा मिळताना तो कृषी आंदोलनासारखाच पाठिंबा उभारून येताना दिसत आहे. शेतकरी आंदोलनाच्या वेळी शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या दिलाच होता. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका नजीक येताच शेतकऱ्यांचे बडे नेते कोलकात्यामध्ये मोठ्या रॅली घेण्यासाठी पोहोचले. राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांनी त्या रॅलीचे नेतृत्व केले होते.



आता कुस्तीगीर आंदोलनात या कृषी आंदोलकांची परतफेड करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कुस्तीगीरांना पाठिंबा देण्यासाठी कोलकत्याच्या हजारा चौकापासून रवींद्र सदन पर्यंत रॅली काढली. यामध्ये त्यांच्या तृणमूल काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. उद्या यापैकी काही कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ दिल्लीला जाऊन कुस्तीगीरांची भेट घेणार आहे आणि हेच नेमके ते कुस्तीगीर आंदोलनात शेतकरी आंदोलनाचे रिपिटेशन दिसते आहे.

दरम्यानच्या काळात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुस्तीगीरांच्या आंदोलनासंदर्भात थेट पंतप्रधानांना पत्र लिहून त्यात लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यामुळे कुस्तीगीरांच्या आंदोलनाने, जे आधीच राजकीय होते, त्याने आणखी मोठे राजकीय वळण घेतल्याचे स्पष्ट होत आहे.

Wrestlers agitation taking turn of farmers agitation

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात