भाजपाचे महाजनसंपर्क अभियान; महाराष्ट्रात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभांचा धडाका

प्रतिनिधी

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारच्या ९ व्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपातर्फे देशभरात आज ३१ मे पासून महिनाभर महाजनसंपर्क अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजमेरच्या सभेपासून केली. या संपर्क अभियानाद्वारे ८० कोटी नागरिकांपर्यंत मोदी सरकारची विकास कामे आणि कल्याणकारी योजनांची माहिती पोहोचवली जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात ५१ रॅली, ५००हून अधिक सभांचा धडाका लावला जाणार आहे. BJP to hold 51 big and 500 small rallies in majajan Samprak abhiyan

महाजनसंपर्क अभियानाचे प्रदेश संयोजक आमदार प्रवीण दरेकर आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी बुधवारी भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत याविषयी माहिती दिली. यावेळी दरेकर म्हणाले की, ३१ मे ते ३० जून असा सुमारे महिनाभर महाजनसंपर्क कार्यक्रम चालणार आहे. यादरम्यान देशभरात ५१ रॅली, ५०० हून अधिक सभा आणि ६०० हून अधिक पत्रकार परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदार संघातील १ हजार अशा पद्धतीने सर्व लोकसभा मतदार संघांतील ५ लाखांहून अधिक विशेष कुटुंबांशी संपर्क साधला जाईल.

लाभार्थी आणि ज्येष्ठ कार्यकर्ता संपर्क असे विविध कार्यक्रम लोकसभा, विधानसभा आणि बूथ स्तरावर आयोजित केले जाणार आहेत. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त, २३ जून रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजिटल रॅलीद्वारे देशभरातील १० लाख बूथवर पक्ष कार्यकर्त्यांशी थेट संवाद आणि संपर्क साधतील, असेही दरेकर यांनी सांगितले.

योगींसह ‘हे’ केंद्रीय नेते येणार

राज्यात प्रत्येकी ४ लोकसभा मतदारसंघांचे विभाग करण्यात आले असून या मतदारसंघांत राज्याचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अनुराग ठाकूर, प्रल्हादसिंह पटेल, अजयकुमार मिश्रा, खासदार तीरथसिंह रावत, सदानंद गौडा, मध्य प्रदेशचे मंत्री अरविंद भदुरिया आदी प्रवास करणार असल्याची माहिती आशिष शेलार यांनी दिली.

मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामगिरीची विस्तृत माहिती देण्यासाठी 9yearsofseva.bjp.org ही वेबसाइट सुरू केली असून जनसंपर्क आणि अभियानात सहभागी होण्यासाठी भाजपने 9090902024 हा मिस्ड कॉल नंबर देखील सुरू केल्याची माहिती देण्यात आली.

BJP to hold 51 big and 500 small rallies in majajan Samprak abhiyan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात