गुजरात निवडणूक : पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री पटेलांना नवे टार्गेट; नरेंद्रभाईंचे रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी तोडावे; पण कसे?, ते वाचा


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : गुजरातची विधानसभा निवडणूक गेली 27 वर्षे भाजप जिंकत आहे. अँटी इन्कबन्सीच्या फॅक्टर वर प्रत्येक वेळी प्रो इन्कबन्सी मात करत आली आहे. पण त्यासाठी भाजपचे नेतृत्व नेहमी प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे फंडे वापरत आहे. Prime Minister Modi’s new target for Chief Minister Patel

2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक नवा फंडा वापरत आहेत. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना नवे टार्गेट दिले आहे. नरेंद्रभाईंचे रेकॉर्ड भूपेंद्रभाईंनी तोडावे, असे हे नवे टार्गेट आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने तीन निवडणुका लढवल्या. त्या प्रत्येक निवडणुकीत मोदींनी 110 ते 125 या दरम्यान जागा मिळवून दाखवल्या. 2017 च्या निवडणुकीत पहिल्यांदा भाजपची टॅली 100 च्या खाली आली. म्हणजे 99 आमदार निवडून आले. काँग्रेसचे 87 आमदार निवडून आले होते.

– सावध पवित्रा, नवा फंडा

त्यामुळे 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप अधिक सावध होऊन निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. 2022 च्या निवडणुकीत भाजपने 42 आमदारांचे तिकीट कापले आहे. यात सर्व जेष्ठ आणि वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे .माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांना पंजाब भाजपचे प्रभारी केल्यानंतर त्यांचे नाव तसेही गुजरातच्या राजकारणातून हटलेच आहे. पण माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना देखील पक्षाने तिकीट दिलेले नाही. त्यामुळे बहुतांश नवे चेहरे जनतेसमोर भाजपने आणले आहेत. हा मुद्दा लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीत एक नवा फंडा आणला आहे तो म्हणजे गुजरात मधल्या प्रत्येक शहरातल्या जाहीर सभेनंतर ते जनतेला विचारत आहेत, “तुम्ही माझे एक काम कराल का?”, जनतेने त्यांना होकारात्मक प्रतिसाद दिला, की ते सांगत आहेत, “या सभेनंतर आपल्या घरी जा आणि घरातील जेष्ठ व्यक्तींना सांगा नरेंद्र भाईंनी आठवण काढली होती आणि तुम्हाला नमस्कार सांगितला आहे.”

मोदींचे ज्येष्ठत्वाशी नाते

गुजरातच्या जनतेशी आपली नाळ कशी जोडली आहे हे दाखविण्याचा पंतप्रधान मोदींचा हा नवा फंडा आहे. ते मुख्यमंत्री पदावरून उतरून पंतप्रधान पदावर गेलेल्याला 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या अनेक व्यक्ती देखील आता ज्येष्ठत्वाच्या पदाला पोहोचल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदींचे गुजराती जनतेशी असलेले नाते देखील आता जेष्ठत्वाकडे झुकले आहे आणि या जेष्ठत्वाच्या नात्याला मोदी 2022 च्या निवडणुकीच्या निमित्ताने उजाळा देऊन ते अधिक दृढ करू इच्छित आहेत.

अर्थात गुजरातच्या निवडणुकीत भाजपने वापरलेला हा काही एकमेव नवा फंडा नाही. असे अनेक फंडे छोट्या मोठ्या प्रमाणावर भाजप काय पण बाकीचे पक्षही वापरत आहेत. पण निवडणुकीचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाले, तर नरेंद्र मोदी हे इतरांपेक्षा अनेक पावले पुढे असतात त्याचे उदाहरण वर लिहिले आहे.

Prime Minister Modi’s new target for Chief Minister Patel

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात