मंगळवारी पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये आहेत. वाराणसी येथे पोहोचल्यावर पंतप्रधानांनी महामानव मदन मोहन मालवीय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आज म्हणजेच १३ मे रोजी येथे रोड शो करत आहेत. काशीतील या 6 किलोमीटर लांबीच्या रोड शोसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. पंतप्रधान मोदी उद्या, मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नामांकनापूर्वी मोदी गंगेत स्नान करतील.Prime Minister Modis grand road show in Varanasi great response from the public
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील लंका चौकातून रोड शोला सुरुवात केली. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित आहेत. मोदी हे सध्याचे खासदार आणि वाराणसीचे उमेदवार आहेत. काँग्रेसने यूपीचे पक्षप्रमुख अजय राय यांना वाराणसीमधून उमेदवारी दिली आहे. वाराणसीतील पंतप्रधान मोदींच्या रोड शोची काशी विश्वनाथ मंदिरात समाप्ती होण्याची जोरदार तयारी करण्यात आली आहे.
वाराणसीमध्ये मोदींच्या रोड शो दरम्यान, वारणसीमधील दहा वर्षांच्या विकासाची झलक वाराणसीच्या त्या भागात दाखवली जात आहे जिथे पंतप्रधानांचा रोड शो जाईल, ज्यामध्ये देशातील पहिल्या सार्वजनिक वाहतूक रोपवेचाही समावेश आहे.
वाराणसीचे हृदय म्हटल्या जाणाऱ्या गोदौलिया चौकाला नववधूप्रमाणे सजवण्यात आले आहे. वाराणसीतील एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, गेल्या 10 वर्षांत वाराणसीमध्ये मी खूप विकास पाहिला आहे. हे सर्व घडले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे. मला आशा आहे की यावेळी देखील ते 400 पेक्षा जास्त जागा जिंकतील आणि पुन्हा सत्तेत येतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App