प्रतिनिधी
नवी दिल्ली : सुमारे 4,400 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ करण्यासाठी आणि केंद्र सरकारच्या गृहनिर्माण योजनेंतर्गत 19,000 लाभार्थ्यांना घरे वाटप करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी गुजरातला भेट देणार आहेत.Prime Minister Modi will lay the foundation stone of projects worth 4400 crores during his visit to Gujarat today
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोदी गांधीनगरमधील ‘ऑल इंडिया एज्युकेशन युनियन कन्व्हेन्शन’ला उपस्थित राहणार असून गिफ्ट सिटीलाही भेट देतील. गांधीनगरमधील कार्यक्रमादरम्यान मोदी 2,450 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील, असे निवेदनात म्हटले आहे.
लाभार्थ्यांना सुपूर्द करतील घरे
यामध्ये नगरविकास विभाग, पाणीपुरवठा विभाग, रस्ते व वाहतूक विभाग आणि खाण व खनिज विभागाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान ते प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) लाभार्थ्यांना चाव्या सुपूर्द करतील. या प्रकल्पांचा एकूण खर्च सुमारे 1,950 कोटी रुपये आहे.
राज्यातील शिक्षकांनाही भेटणार
गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी (गिफ्ट सिटी) च्या भेटीदरम्यान मोदी तेथे सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचा आढावा घेतील, असे पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. यादरम्यान ते अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे अनुभव आणि भविष्यातील योजना समजून घेतील. अखिल भारतीय शिक्षण संघ अधिवेशन हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक महासंघाचे 29 वे द्विवार्षिक संमेलन आहे. सेंटर ऑफ ट्रान्सफॉर्मिंग एज्युकेशनमधील शिक्षक ही या परिषदेची थीम आहे.
असा असेल पंतप्रधान मोदींचा दौरा
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App