ऑस्ट्रेलियन मंत्री डॉन फॅरेल यांनी सांगितलेल खास किस्सा पंतप्रधान मोदींनी केला ट्वीट

PM Modi tweet photo

यातून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंध अधोरेखित होते असल्याचे  मोदींनी म्हटले आहे.

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज(रविववार) ऑस्ट्रेलियन व्यापार मंत्री डॉन फॅरेल यांनी सांगितलेला भारताशी निगडीत असलेला एक खास किस्सा आणि एक फोटो ट्वीटद्वारे शेअर केला आहे. ज्यामध्ये मंत्री डॉन फॅरल यांनी सांगितले आहे की, कशाप्रकार त्यांच्या एक शिक्षिका गोव्यातून ऑस्ट्रेलियात गेल्या. तर मोदींनी यातून भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील समृद्ध सांस्कृतिक संबंध अधोरेखित होते असल्याचे म्हटले आहे. फॅरेल हे ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अल्बनीज यांच्याबरोबर मागील आठवड्यात भारतात आले होते. Prime Minister Modi tweeted a special story told by Australian Minister Don Farrell

मोदींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझे प्रिय मित्र अल्बनीज यांच्या सन्मनार्थ दुपारी भोजना दरम्यान ऑस्ट्रेलियन व्यापार आणि पर्यटनमंत्री डॉन फॅरल यांनी काही मजेशीर गोष्टी सांगितल्या. त्यांना ग्रेड 1 मध्ये श्रीमती एबर्ट यांनी शिकवले होते. ज्यांनी त्यांच्या जीवनावर खोलवर प्रभाव टाकला आणि त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आधाराचे श्रेयही त्यांनाच दिले. एबर्ट त्यांचे पती आणि त्यांची मुलगी लियोनी १९५०च्या दशकात भारतामधील गोव्यामधून अॅडलेडमध्ये स्थलांतरित झाले आणि ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथील शाळेत शिकवू लागले. एबर्ट यांची मुलगी लियोनी दक्षिण ऑस्ट्रेलियातील शिक्षण संस्थेची अध्यक्ष बनली.


“काँग्रेस मोदीची कबर खोदण्याचे स्वप्न पाहत आहे आणि मोदी गरिबांचे जीवन सुलभ करण्यात व्यस्त आहे” – पंतप्रधान मोदींनी लगावला टोला!


पंतप्रधान मोदींनी सांगितले की, भारत आणि ऑस्ट्रेलियातील समृद्ध सांस्कृतिक संबंधांना अधोरेखित करणारा हा किस्सा ऐकूण मला खूप आनंद झाला. जेव्हा कोणी आपल्या शिक्षकाचा प्रेमाने उल्लेख करतो तेव्हा ते ऐकणे देखील तितकेच आनंददायी असते.

Prime Minister Modi tweeted a special story told by Australian Minister Don Farrell

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात