विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दरवर्षी लष्करी जवानांसोबत दिवाळी साजी करण्याची परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षीही कायम ठेवणार आहे. पंतप्रधान यंदाच्या वर्षीही काश्मीरमध्ये लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. काश्मीरमधील नौशेरा सेक्टर आणि राजोरीतील ब्रिगेड मुख्यालयात दिवाळी साजरी करून पंतप्रधान जवानांची उमेद वाढविणार आहेत.Prime Minister Modi to celebrate Diwali in Kashmir with Army personnel
पंतप्रधानांनी २०१९ मध्ये राजोरी येथे जवानांसोबत दिवाळी साजरी करून त्यांचे मनोबल वाढविले होते. आताही पंतप्रधान पुन्हा जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यासाठी लष्कराकडून सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी लष्कराने हाय अलर्ट दिला असून दहशतवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन सुरू केले आहे.
राजोरी आणि पूंछ जिल्ह्यातील सीमा भागाजवळील घनदाट जंगलामध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून आॅपरेशन सुरू आहे. विशेषत: राजोरी भागात विशेष काळजी घेतली जात आहे.पंतप्रधानांनी गेल्या वर्षी राजस्थानातील जैसलमेर येथील लोंगोवाला बॉर्डरवर दिवाळी साजरी केली होती.
त्यांच्यासोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत आणि लष्करप्रमुख एम. एम. नरवणे होते. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचा कार्यभार घेतल्यापासून मोदी लष्करी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. लष्करी जवानांकडून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो.
देशाच्या रक्षणासाठी कुटुंबियांपासून दूर राहावे लागणाऱ्या लष्करी जवानांची दिवाळी पंतप्रधानांच्या भेटीमुळे आनंददायी होते. यापूर्वी त्यांनी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड पंजाब, राजस्थान आणि जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागात दिवाळी साजरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App