पंतप्रधान मोदींनी आसामला दिली १४ हजार ३०० कोटींची भेट, गुवाहाटी AIIMS उद्घाटन

ईशान्य भारताला पहिले एम्स आणि तीन वैद्यकीय महाविद्यालये मिळाली.

विशेष प्रतिनिधी

गुवाहाटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामच्या दौऱ्यावर असून, त्यांनी राज्याला १४ हजार ३०० कोटी रुपयांची भेट दिली आहे. मोदींनी ईशान्य भारताला पहिले एम्स आणि तीन वैद्यकीय महाविद्यालये भेट दिली आहेत. Prime Minister Modi gave a gift of 14 thousand 300 crores to Assam Guwahati AIIMS inauguration

ते म्हणाले की, गेल्या ९ वर्षांत ईशान्येच्या कनेक्टिव्हिटीबाबत बरीच चर्चा झाली आहे. आज इथे जो कोणी येतो, तो इथले कौतुक केल्याशिवाय राहत नाही. याशिवाय मोदी म्हणाले की, येथे सामाजिक पायाभूत सुविधांवर काम करण्यात आले आहे. इथे शिक्षण आणि वैद्यक क्षेत्रात खूप काम झाले आहे. आज येथे एक एम्स आणि तीन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला आहे.

ईशान्येच्या विकासामुळे काही लोकांना त्रास –

पंतप्रधान मोदी म्हणाले की, ईशान्येच्या विकासाच्या चर्चेने काही लोक त्रस्त आहेत. या लोकांना श्रेयाची चिंता असते. श्रेय घेण्यासाठी भुकेलेल्या लोकांना ईशान्य भारत दूर वाटायचा. त्यांनी फक्त परकेपणाची भावना निर्माण केली. सध्याचे सरकार सेवेच्या भावनेने काम करत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, दिल्लीचे एम्स ५० च्या दशकात बांधले गेले. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक उपचारासाठी येत असत. अटलजींच्या सरकारने इतर ठिकाणी एम्स सुरू करण्याचा प्रयत्न केला, परंतु नंतर सर्व काही ठप्प झाले, जे एम्स उघडण्यात आले ते सुविधांअभावी कार्यरत होते. आम्ही १५ एम्सवर काम केले. मागील सरकारांच्या धोरणांमुळे आपल्याकडे डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिकांची कमतरता आहे. ही कमतरता दर्जेदार आरोग्य सेवेतील अडथळा होती,  त्यामुळे सध्याच्या सरकारने वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक वाढविण्याचे काम केले आहे.

Prime Minister Modi gave a gift of 14 thousand 300 crores to Assam Guwahati AIIMS inauguration

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात