विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दक्षिणेतील पाचही राज्यातून बाहेर जाऊन महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपची दक्षिण स्वारी सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दक्षिण भारतीय राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. कर्नाटक तामिळनाडू आंध्र आणि तेलंगण या चार राज्यांचा झंझावाती दौरा पंतप्रधान मोदींनी केला आहे. या पाचही राज्यांमध्ये विविध विकास प्रकल्पांची भूमिपूजन आणि उद्घाटने पंतप्रधान मोदींनी केली. या दौऱ्याचे वैशिष्ट्य असे की कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात सहभागी झाले. परंतु तेलंगणामध्ये मात्र मोदींच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री के. सी. आर. चंद्रशेखर राव सामील झाले नाहीत. ते सध्या तेलंगण राष्ट्र समितीचे रूपांतर भारत राष्ट्र समितीमध्ये करून सर्व विरोधी पक्षांचे नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. Prime Minister Modi also rode south after the Bharat Jodo Yatra left the southern states
या राजकीय पार्श्वभूमीवर तेलंगणची राजधानी हैदराबाद मध्ये घेतलेल्या भाजप महामेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र विरोधी पक्षाच्या ऐक्य प्रयत्नांवर जोरदार हल्लाबोल चढवला. विरोधी पक्षांचे ऐक्य म्हणजे सर्व भ्रष्टाचाऱ्यांचे ऐक्य आहे, असे शरसंधान त्यांनी साधले. केंद्र सरकारने भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई थांबायला तयार नाही, हे पाहून सगळे भ्रष्टाचारी एकमेकांचा हात धरून एकजूट साधत आहेत. कायदेशीर कारवाई पासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनतेला लुटणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना केंद्र सरकार अजिबात सोडणार नाही. त्यांच्याकडून पै पै वसूल केली जाईल आणि तिचा लाभ गरिबांच्या योजनांसाठी करून दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले.
सर्व विरोधकांकडे मोदींना शिव्या देण्याशिवाय काहीच उरले नाही. त्यामुळे ते रोज सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मोदींना शिव्याच घालत असतात. स्वतः जवळची सगळी डिक्शनरी त्यांनी मोदींना शिव्या देण्यातच खपवली आहे. पण त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. विरोधकांनी मोदींना दिलेल्या शिव्या तुम्ही एन्जॉय करा आणि जनतेमध्ये सरकारने काम केलेल्या सर्व बाबींचा सकारात्मक प्रचार करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना केले.
Thank you Bengaluru for the memorable welcome to this dynamic city. pic.twitter.com/TFOcj4XwTo — Narendra Modi (@narendramodi) November 11, 2022
Thank you Bengaluru for the memorable welcome to this dynamic city. pic.twitter.com/TFOcj4XwTo
— Narendra Modi (@narendramodi) November 11, 2022
गेली 20-22 वर्षे मी वेगवेगळ्या व्हरायटीच्या शिव्याच खातो आहे. परंतु माझ्या शरीरात देवाने अशी रचना केली आहे की विरोधकांच्या सर्व शिव्या माझ्या न्यूट्रिशनचे म्हणजे पोषणमूल्याचे काम करतात. त्यामुळे दररोज दोन-तीन किलो शिव्या खाल्ल्यानंतर माझ्यात एक सकारात्मक ऊर्जा पैदा होते आणि त्या सकारात्मक ऊर्जेमुळेच मी रोज नव्या उत्साहाने जनतेची सेवा करू शकतो. विरोधकांच्या सर्व शिव्या माझ्यात पोषणमूल्य भरतात. तुम्ही देखील विरोधक मोदींना देत असलेल्या शिव्या सकारात्मक घेऊन जनतेसाठी सेवा समर्पण भावानेच काम करा, असे आवाहन मोदींनी केले.
राहुल गांधींचे भारत जोडो दक्षिणेतील पाच राज्यांमधून बाहेर पडून महाराष्ट्रात पोहोचली असताना पंतप्रधान मोदींनी दक्षिणेतल्या चार राज्यांचा झंझावाती दौरा केला आणि त्यातल्या एका सभेत सर्व विरोधकांचा समाचार घेऊन त्यांच्या शिव्या त्यांच्यावरच उलटवल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App