Prime Minister Modi : काँग्रेसला ओबीसी पंतप्रधान सहन नाही होत, ओबीसी – दलितांमध्ये फूट पाडायाचा काँग्रेसचा डाव; पंतप्रधान मोदींचा घणाघात!!

Prime Minister Modi

विशेष प्रतिनिधी

नाशिक : Prime Minister Modi काँग्रेसला आणि शहजाद्यांना देशाचा पंतप्रधान ओबीसी होणे हे सहन होत नाही. कारण त्यामुळे त्यांच्या सत्ता वर्चस्वाला धक्का बसतो त्यातून काँग्रेसने आता ओबीसी दलित आदिवासी यांच्यामध्ये फूट पाडायचा डाव आखला आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक मधून काँग्रेसवर हल्लाबोल केला.Prime Minister Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी नाशिककरांना देखील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं आवाहन केलं.

– पंतप्रधान मोदी म्हणाले :

जेव्हा नीती स्पष्ट असते, नियत स्वच्छ असते तेव्हा त्याचे चांगले परिणाम दिसतात. नाशिकचे माझे बंधू – भगिनी हे चांगले परिणाम पाहत आहेत. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भार भारताची ताकद बनत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पर्वा आहे, ना कोर्टाची, ना देशाच्या भावनेची पर्वा आहे. ते फक्त देखाव्यासाठी खिशात कोऱ्या पानांचे संविधान घेऊन फिरतात.



 

– काल तुम्ही पाहिलं असेल. पोलखोल झाली. जेव्हा संविधानाच्या सन्माचा विषय येतो तेव्हा ते पळून जातात. हे काँग्रेसवाले असे आहेत की, त्यांनी 75 वर्षांपर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला लागू होऊ दिलं नाही. 75 वर्षांपर्यंत देशात एक संविधान नव्हतं. जम्मू-काश्मीरचं संविधान वेगळं होतं. ते बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान नव्हतं. ते पाप काँग्रेसचं होतं. काँग्रेसने कलम 370 सारखी भिंत उभी केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान तिथे जाऊच शकत नव्हतं.

– भाजपप्रणित एनडीएने कलम 370 हटवलं आणि एक देश, एक संविधान लागू केलं. माझी बाबासाहेब आंबेडकरांना सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. जेव्हा भारताचं संविधान जम्मू-काश्मीरमध्ये पूर्ण देशात आनंद साजरा केला जात होतो. मी माझ्या नाशिकच्या लोकांना विचारु इच्छुतो, काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्याने तुम्हाला आनंद झाला की नाही? या काँग्रेसवाल्यांचे कान फुटतील इतक्या जोराने सांगा तुम्हाला आनंद झाला की नाही!!

– आपल्याला आनंद झाला पण काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात उंदिर धावायला लागले. त्यांना दुखायला लागलं. दोन-तीन दिवसाआधी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा कलम 370 लागू करण्यासाठी हंगामा केला. या लोकांना पुन्हा बाबासाहेबांचं संविधान जम्मू-काश्मीरमधून काढायचं आहे. संविधानाच्या विरोधात दलित, मागास, आदिवासींच्या विरोधात काँग्रेस आहे, तितकेच आघाडीचे त्यांचे सहकारी देखील आहे.

– निवडणुकीच्या वेळी पक्ष आपल्या कामकाजांचा हिशोब देवून जनतेत जाते. भाजप आणि महायुती देखील आपल्या कामांचा हिशोब देत आहे. पण भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडे एकच पद्धत आहे. काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांची खोटे बोलण्याची दुकान आहे. काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी महाराष्ट्रात हे दुकान सुरु केलं आहे. काँग्रेसने कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचलमध्येदेखील असेच खोटे दुकान सुरु केले होते. पण परिणाम काय झाले, निवडणुका संपल्या आणि दुकानेच शटर लागले.

– दिलेली आश्वासने पूर्ण करणं तर दूर काँग्रेसशासित राज्यात सरकार चलवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खर्चासाठी जनतेचे टॅक्स वाढवले जात आहेत. जनतेकडून वसुली होत आहे. जनतेला देखील यांचं खरं रुप माहिती समजली आहे. महाराष्ट्राची जनता हे जाणून आहे. एकीकडे महायुतीचं घोषणापत्र दुसरीकडे आघाडीचं घोटाळापत्र. कारण जिथे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी असतील तिथे घोटाळा होणार म्हणजे होणार”, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

– संपूर्ण देशाने काँग्रेसला घरचा रस्ता दाखवला आहे. काँग्रेस आता राष्ट्रीय राहिलेली नाही. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा अनेक राज्यांत काँग्रेस दुसऱ्या पक्षांसोबत निवडणूक लढवत आहे. काँग्रेस आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही. त्यामुळे काँग्रेसने राजकारणात स्वत:ला वाचवण्यासाठी स्वत:चं सर्वात मोठं हत्यार उपसलं आहे. ते हत्यार म्हणजे एससी, एसटी आणि ओबीसींची एकात्मता तोडा आणि राज्य हिसकवा. काँग्रेसचे नेते ओबीसींमध्ये जातींना एकमेकांच्या विरोधात लढवायचा इरादा राखून आहेत.

Congress Can’t Tolerate OBC Prime Minister, Congress Ploy to Divide OBC – Dalits; Prime Minister Modi’s attack!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात