धमकी मिळाल्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) तत्परतेने कारवाई करत दोन तरुणांना अटक केली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना ( Narendra Modi ) जीवे मारण्याची धमकी देणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही बातमी व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांना धक्काच बसला. दोन तरुणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (इन्स्टाग्राम) जीवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी मिळाल्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) तत्परतेने कारवाई करत दोन तरुणांना अटक केली.
आयबीने दोन्ही तरुणांना राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून अटक केली आहे. या दोन्ही तरुणांची चौकशी करण्यात येत आहे. या दोन्ही तरुणांनी सोशल मीडियावर अशा पोस्ट कशा केल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. यामागे कोणती विदेशी शक्ती किंवा कोणतीही दहशतवादी संघटना आहे का, याचाही शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मात्र, अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेच्या सहभागाचे वृत्त नाही. तरूणाने पीएम मोदींना इंस्टा वर जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगितले जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहिती मिळताच आयबी टीमने पीएम मोदींना धमकावणाऱ्या आरोपींविरोधात राजस्थानच्या डीग जिल्ह्यातून दोन तरुणांना अटक केली. पकडलेल्या तरुणांमध्ये एकाचे नाव राहुल मेयो आणि दुसऱ्याचे नाव शाकीर मेयो असे आहे. अटकेनंतर चौकशीत या दोन्ही आरोपींचा सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान ही धमकी देणाऱ्या तरुणाने याप्रकरणी इतर लोकांशीही संपर्क साधल्याचे समोर आले आहे. मात्र, कोणत्या आरोपीचे कोणत्या व्यक्तीशी फोनवर बोलणे झाले, याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App