‘’बिहारसाठी काहीतरी चांगले करा, दुसऱ्यांना दोष देत राहिल्यास …’’ प्रशांत किशोर यांचा तेजस्वी यादवांवर निशाणा!


तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर केलेल्या आरोपांनंतर प्रशांत किशोर यांनी उत्तर दिले आहे.

विशेष प्रतिनिधी

समस्तीपुर : जन सुराजचे संस्थापक  आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर हे गावोगावी फिरत आहेत. त्याचवेळी शनिवारी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या विकासाच्या दाव्यांचा पर्दाफाश करताना ते म्हणाले की, ‘’तुम्ही इथले सरकार चालवत आहात आणि दिल्लीत बसलेल्या लोकांना दोष देत आहात.’’ Prashant Kishor criticizes Tejashwi Yadav

याशिवाय   ‘’बिहारमधील शाळा दुरुस्त करण्यापासून तुम्हाला कोणी रोखले?, बिहारमध्ये चांगले रुग्णालय बांधण्यापासून कोणी रोखले?, बिहारमधील रस्ते दुरुस्त करण्यापासून कोणी रोखले?, येथे रोजगार निर्माण करण्यापासून कोणी रोखले?’’ असे प्रश्नही प्रशांत किशोर यांनी विचारले आहेत.

याचबरोबर प्रशांत किशोर म्हणाले की, ‘’हे फक्त राजकारण आहे. बिहारमधील शाळांमधील मुलांच्या शिक्षणावर राज्य सरकार दरवर्षी ४०  हजार कोटी रुपये खर्च करते. याच्याशी केंद्राचा काय संबंध? एवढा पैसा खर्च करून बिहारमध्ये चांगल्या शाळा बांधल्या तर केंद्र सरकार थांबवणार का? केंद्र सरकार मदत करत नाही. ते बिहारसाठी काही विशेष करत नाही, ते ठीक आहे, पण बिहार सरकारचे स्वतःचे २ लाख ६० हजार कोटी रुपयांचे बजेट, ते पैसे वापरून, बिहारसाठी काहीतरी चांगले करा, दुसऱ्यांना दोष देत राहिल्यास काय होईल?’’

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर म्हणाले की, येथे कारखाना नाही असे अनेकजण सांगत आहेत. राजस्थानसारख्या राज्यात दुधाचे दरडोई उत्पादन बिहारच्या तुलनेत पाचपट जास्त आहे. तुम्हाला काय वाटते, बिहारमधील लोकांना गायी-म्हशींचे पालनपोषण कसे करावे हे माहित नाही. इथल्या मुलांना अभ्यास कसा करायचा हेच कळत नाही, इथे शाळा नसताना इतरांना का दोष देत आहात?  अशा शब्दांमध्ये प्रशांत किशोर यांनी तेजस्वी  यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.

Prashant Kishor criticizes Tejashwi Yadav

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात