नाशिक मध्ये मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संस्थेचे उद्घाटन


प्रतिनिधी

नाशिक : नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण संस्थेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. A golden opportunity for military pre-recruitment training for girls in Nashik

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आजचा कार्यक्रम हा एक आगळा वेगळा असून या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केले यांचा विशेष आनंद असल्याचे सांगितले. सरकार या संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लागेल ते सर्व सहकार्य करू असे सांगून आश्वस्त केले.

महाराष्ट्रात मुलींसाठी अशी प्रशिक्षण संस्था सुरू होते ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या संस्थेच्या माध्यमातून अनेक मुली सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचे आपले स्वप्न साकार होईल याचा मलाही अभिमान आहे, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

देशाच्या सीमेवर आपले जवान तैनात आहेत त्यामुळे आपण सुरक्षित आहोत त्यामुळे अशा संस्था ही आपल्या राज्याची खरी ओळख ठरतील असा विश्वास यावेळी बोलताना व्यक्त केला..

यासमयी उपमुख्यमंत्री अजित पवार, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उद्योग मंत्री उदय सामंत, तसेच संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

A golden opportunity for military pre-recruitment training for girls in Nashik

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात