प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या लाभासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत लॉटरी पद्धतीने शेततळे आणि ड्रीप सिस्टीम यांचे वाटप होत होते. पण इथून पुढे मागेल त्याला शेततळे आणि ड्रीप सिस्टीम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती नव्याने कृषिमंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांनी दिली. Now there is no lottery system, but the farmer will get the farm
मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आज आढावा बैठक घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुंडे म्हणाले, की आज शेतकरी संकटात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी आहे. आजच्या आढावा बैठकीत चर्चा झालेले निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येतील. सुरुवातीला लॉटरी सिस्टीमनुसार शेततळे आणि ड्रीप सिस्टीम अर्थात सिंचन दिले जात होते. मात्र, आता मागेल त्याला शेततळे ही योजना असेल असा महत्त्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. पर्यंत तीन लाख शेतकऱ्यांनी शेततळे आणि ड्रीप सिस्टीम मागितली आहे ती त्यांना देता येईल.
पर्जन्यमान जसे लांबलंय तसं या पुढच्या काळात आता लांबायला नको. किती ठिकाणी दुबार पेरणीची आवश्यकता आहे, या अनुषंगाने पण चर्चा करण्यात आलेली आहे. एक रुपयाची विमा योजना दिली आहे. विमा योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा. शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा. जर हमीभावापेक्षा जास्त रेट जर मिळत असेल तर कुणालाही नाराज व्हायचं कारण नाही. टॅमॅटोचे दर वाढले म्हणून काही लोकांनी आंदोलन केलीत. जर एखाद शेतकऱ्याला टॅमॅटोचे जास्त पैसे मिळाले तर चांगले आहे. त्या अनुषंगाने राजकारण होऊ नये. एक महिना टॅमेटो नाही खाल्ले तर प्रोटीन कमी होणार नाही, असा टोला अभिनेता सुनिल शेट्टी याला लगावला.
बोगस बियाणे कुठल्याही शेतकऱ्यापर्यंत पोहोचायलाच नको. जर कोणी बोगस बियाणे विकत असेल तर कृषी खाते त्यांचा बाजार उठवेल. पर्जन्यमानाची परिस्थिती पाहताना कुठे कमी पडतो. कुठे जास्त पडतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान व्हावं असं शासन बघेल, असं आश्वासनही धनंजय मुंडे यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more