प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं पक्ष कधी स्थापन करणार अन् पहिली निवडणूक कुठे लढणार?

बिहारची राजधानी पाटणा येथे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी मोठी घोषणा केली Prashant Kishor announced when will he form the party and where will he contest the first election

विशेष प्रतिनिधी

पाटणा: राजकीय रणनितीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर उर्फ ​​पीके यांनी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा केव्हा करणार हे जाहीर केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या पक्षाबाबत चर्चा सुरू आहे. प्रशांत किशोर यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष बिहार विधानसभेची पहिली निवडणूक लढवणार आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी रविवारी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की 2 ऑक्टोबर रोजी ते स्वतःचा पक्ष स्थापन करणार असून त्यांचा पक्ष बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार आहे.

पाटणा येथील जन सूराज्यच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबरला पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की त्यांचा पक्ष 2025 मध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका लढवणार आहे. पक्ष स्थापनेपूर्वी पाटणा येथील बापू सभागृहात जन सूराज्यच्या कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा झाला. पक्षाचा नेता कोण असेल हेही जनताच ठरवेल, असे प्रशांत किशोर म्हणाले. जन सूराज्य हा पक्ष प्रशांत किशोर किंवा कोणत्याही जातीचा किंवा कोणत्याही कुटुंबाचा किंवा व्यक्तीचा नसून बिहारच्या जनतेचा असेल, जे मिळून ते तयार करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

याआधी १० जून रोजी पाटणा येथील जन सूराज्यच्या कार्यक्रमात तीन प्रस्ताव आणण्यात आले होते. तेथे उपस्थित लोकांनी या प्रस्तावांना होकार दिला. पहिला प्रस्ताव जन सूराज्यला राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्याबाबत होता, त्यावर सर्वांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी जन सूराज्यला राजकीय पक्ष बनवावे, असे सांगितले. दुसरा प्रस्ताव बिहारच्या सर्व विधानसभा जागांवर निवडणूक लढवण्याबाबत होता, त्यावरही सर्वांनी सहमती दर्शवली. त्याचवेळी, तिसरा प्रस्ताव समाजातील सर्व घटकांना त्यांच्या संख्येनुसार निवडणुकीची तिकिटे देण्याचा आणि जन सूराज्यमध्ये सहभाग सुनिश्चित करण्याचा होता. या प्रस्तावालाही अनेकांनी सहमती दर्शवली होती.

Prashant Kishor announced when will he form the party and where will he contest the first election

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात