वृत्तसंस्था
मुंबई : NDTV एनडीटीव्हीचे संस्थापक प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी RRPRH च्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. अदानी समूहाने एनडीटीव्हीचा ताबा घेतल्यानंतर कंपनीच्या शेअर्सने उसळी घेतली आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत सुमारे ३२२ रूपयांवरून ४४६.३० रूपयांपर्यंत वाढली असून ती ४० % आहे. Pranav Roy, Radhika Roy resign from NDTV; But the stock bounced back
न्यू दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड (एनडीटीव्ही) चे मालक आणि संस्थापक प्रणव रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी आरआरपीआर होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या (RRPRH) संचालकपदाचा राजीनामा दिला. राधिका रॉय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांची बहीण आहे.
मुंबई शेअर बाजाराला कंपनीने रॉय दाम्पत्याने २९ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे, तसेच सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया आणि सेंथिल चेंगलवर्यन यांची RRPRH च्या बोर्डावर संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांसह, अदानी समूहाने एनडीटीव्हीच्या मंडळात प्रवेश केला आहे.
NDTV co-founder Prannoy Roy, wife steps down as NDTV directors Read @ANI Story | https://t.co/WqDe8vGeeQ#PrannoyRoy #PrannoyRoyResigns #RadhikaRoy #NDTV #Adani pic.twitter.com/ef3rjlmwZa — ANI Digital (@ani_digital) November 29, 2022
NDTV co-founder Prannoy Roy, wife steps down as NDTV directors
Read @ANI Story | https://t.co/WqDe8vGeeQ#PrannoyRoy #PrannoyRoyResigns #RadhikaRoy #NDTV #Adani pic.twitter.com/ef3rjlmwZa
— ANI Digital (@ani_digital) November 29, 2022
आज या बातमीनंतर एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागला आहे. शेअर ५ % वाढून ४४६ रुपयांवर पोहोचला, तर मंगळवारी तो ४२५ रुपयांवर बंद झाला. विशेष म्हणजे या वर्षी एनडीटीव्हीचे शेअर्स २८८ % आणि एका वर्षात ४७९ % वाढले आहेत.
RRPRH ने सुदिप्ता भट्टाचार्य, संजय पुगलिया, सेंथिल चेंगलवर्यन यांची बोर्डाच्या संचालकपदी नियुक्ती केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला, विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड VCPL ने एनडीटीव्हीची प्रवर्तक कंपनी RRPR ची ९९.५ % हिस्सेदारी खरेदी केली होती. VCPL ही AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेड ची उपकंपनी आहे, ज्यामध्ये अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडची १०० % भागीदारी आहे.
२३ ऑगस्ट रोजी गौतम अदानी समूहाने एनडीटीव्हीमधील २९.१८ % हिस्सा खरेदी केला. त्यानंतर अदानी समूहाने एनडीटीव्हीचे २६ % अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्याची घोषणा केली होती. यासाठी अदानी समूहाने २२ नोव्हेंबर रोजी खुली ऑफर सादर केली होती, जी ५ डिसेंबरपर्यंत खुली आहे.
अदानी समूहाने ऑगस्ट २०२२ मध्ये विश्वप्रधान कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड (VCPL) चे अधिग्रहण करण्याची घोषणा केली होती. VCPL ने २००९ आणि २०१० मध्ये एनडीटीव्हीच्या प्रवर्तकांना म्हणजेच प्रणव रॉय आणि राधिका रॉय यांना ४०३.८५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. या कर्जाच्या बदल्यात, एनडीटीव्हीमधील २९.१८ % स्टेक कधीही विकण्याची तरतूद कर्जदाराकडून ठेवण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App