विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी असलेल्या महाविकास आघाडीत आपल्याला राजकीय जागा शिल्लक नाही. उद्धव ठाकरेंशी केलेली युती टिकण्याची शाश्वती नाही, अशा राजकीय कोंडी अवस्था झालेल्या प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर नव्या मित्राच्या शोधात तेलंगण राज्य गाठले आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबाद मध्ये त्यांनी मुख्यमंत्री के. सी. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची शक्ती मिळणार का?, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.Prakash Ambedkar in search of new Alliance meet kc chandrashekhar rao
मध्यंतरी सुमारे वर्षभराच्या काळात प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रात भरपूर राजकीय हालचाली केल्या. भेटीगाठी घेतल्या. भाजप विरोधात तात्विक राजकीय आघाडी उभारण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे मन वळविले. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर वंचित बहुजन आघाडीची युती देखील त्यांनी जाहीर केली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाविकास आघाडीत आपल्या वंचित बहुजन आघाडीला काही “पॉलिटिकल स्पेस” मिळवण्याचा प्रयत्न केला. पण यापैकी कुठल्याच राजकीय जुगाड प्रकाश आंबेडकरांसाठी जुळून आला नाही.
त्यामुळेच आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मुहूर्तावर प्रकाश आंबेडकर यांनी थेट हैदराबाद गाठून भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये भाजप विरोधी आघाडी उभारण्याविषयी चर्चा झाली आहे. चंद्रशेखर राव यांनी काहीच दिवसांपूर्वी मराठवाड्यातील नांदेडमध्ये भारत राष्ट्र समितीचे मेळावे घेतले. येत्या काही दिवसात ते संभाजीनगर मध्ये देखील असाच मेळावा घेणार आहेत. यासाठी त्यांना महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मधल्या काही नेत्यांची राजकीय कुमक देखील मिळाली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आघाडीचे नेते धोंगे पाटील तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे 5 माजी आमदार चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीच्या गळाला लागले आहेत. सोलापुरातून काँग्रेसचे माजी खासदार धर्मांणा सार्दूल हे देखील भारत राष्ट्रवादी भारत राष्ट्र समितीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्रातून नवी कुमक
एकीकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माजी आमदार – खासदारांची अशी राजकीय कुमक मिळवल्यानंतर चंद्रशेखर राव यांच्या राजकीय आशा पल्लवीत झाल्या असून आता प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी जर भारत राष्ट्र समितीला जाऊन मिळाली तर महाराष्ट्रात देखील एक तिसरीच आघाडी वेगळ्या पद्धतीने उभे राहू शकते अशी राजकीय परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे.
आघाडीच्या वज्रमुठीत भेगा
एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा सुरू होता होताच वज्रमुठ ढिल्ली पडली. त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी चंद्रशेखर राव यांची भेट घेऊन एक नवा डाव महाराष्ट्रात रचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीपुढे महाविकास आघाडीच्या वज्रमूठीचे आव्हान उभे राहणार की त्या वज्रमुठीत भेगा पडून प्रकाश आंबेडकर आणि चंद्रशेखर राव त्यांची काही तिसरी आघाडी उभी करणार??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App