विशेष प्रतिनिधी
मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आणि भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी बुधवारी विशेष एनआयए न्यायालयात हजेरी लावली. वैद्यकीय उपचारासाठी ठाकूर मुंबईत आल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाने समन्स बजावले नसतानाही त्या खटल्यात हजर झाल्या होत्या.Pradnya Sing appears before court
२००८ ते २०१७ पर्यंत त्या कारागृहात होत्या. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.यापूर्वी मागील वर्षी जानेवारीत त्यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. ठाकूर आणि ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात आरोपींचा समावेश आहे.
आतापर्यंत आठ साक्षीदार खटल्यात फितूर झाले आहेत. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगाव येथील मशिदीबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये सहा जण ठार, तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. मोटरसायकलवर ठेवण्यात आलेल्या बॉम्बमुळे हा स्फोट झाला,
असा आरोप पोलिसांनी केला आहे. या मोटरसायकलची नोंदणी ठाकूर यांच्या नावे आहे. मात्र, बॉम्बस्फोट होण्याच्या खूप आधी ती एकाला विकली होती, असा बचाव ठाकूर यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App