विशेष प्रतिनिधी
जालंधर – पंजाबमध्ये वीज संकट अधिक गडद होत चालले आहे. कोळशाच्या टंचाईमुळे वीज उत्पादन निम्म्यावर आले आहे. पंजाबमध्ये काल आणखी एक औष्णिक विद्युत केंद्र बंद पडले. गोइंदवाल साहिब येथील एक युनिट बंद करावे लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.Power cut in Punjab
तत्पूर्वी शनिवारी पाच युनिट बंद केलेले असताना त्यापैकी एक युनिट पुन्हा कार्यान्वित करण्यात आले. सध्या खासगी औष्णिक विद्युत केंद्राकडे केवळ ३६ तास पुरेल एवढाच कोळसा शिल्लक राहिला आहे.
सध्या पंजाबमध्ये सुरू असलेल्या वीज प्रकल्पात निम्मीच वीज तयार होत आहे. त्यामुळे पंजाबच्या नागरिकांना १५ ऑक्टोबरपर्यंत चार ते सहा तासाच्या भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. पॉवरकॉमचे अधिकारी ए.वेणुप्रसाद म्हणाले,
की गरजेनुसार कोळशाची उपलब्धता होत असल्याने वीजपुरवठा अपुरा राहत आहे. आम्हाला २२ रॅकची गरज असताना ११ रॅक कोळसा उपलब्ध होत आहे. त्यामुळे मागणी आणि उत्पादन यात बरेच अंतर झाले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App