विजयाच्या जल्लोष अर्धवट! पंजाबला धूळ चारल्यानंतर ‘या’ कारणामुळे संजू सॅमसनला १२ लाखांचा दंड


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर मंगळवारी रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यातील दोन्ही डावात चौकार आणि षटकारांचा पाऊस पडला.Half of victory! Sanju Samson fined Rs 12 lakh for ‘this’ after dusting off Punjab

परंतु शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्स संघाने बाजी मारली आणि हा सामना २ धावांनी आपल्या नावावर केला. या विजयासह राजस्थान रॉयल्स संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये विजयाचे वातावरण होते, तर दुसरीकडे कर्णधार संजू सॅमसनला मोठा धक्का बसला आहे.



सामन्यादरम्यान षटकांची गती कमी राखल्यामुळे संजू सॅमसनला दंड ठोठावण्यात आला आहे. संजूच्या राजस्थान संघाचे निर्धारित वेळेत फक्त १९ षटके टाकली. त्यांना एक षटक टाकण्यासाठी जास्तीचा वेळ लागला. यामुळे त्याच्यावर दंड आकारण्यात आला आहे,

आयपीएल गव्हर्निंग काउंसिलच्या जाहीर अहवालानुसार, “आयपीएलच्या आचारसंहिते अंतर्गत राजस्थान रॉयल्स संघाचा हा या हंगामातील पहिलाच गुन्हा आहे. त्यामुळे संजू सॅमसनवर १२ लाखांचा दंड आकारण्यात आला आहे.” जर पुन्हा राजस्थान रॉयल्स संघाकडून अशी चूक झाल्यास, त्यांना यापेक्षा जास्त रक्कमेचा दंड भरावा लागू शकतो.

Half of victory! Sanju Samson fined Rs 12 lakh for ‘this’ after dusting off Punjab

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात