आंतरराष्ट्रीय पातळीवर सक्रीय वैमानिक, वैद्यकीय अधिकारी, विज्ञान, उद्योजकता आणि तंत्रज्ञानातील नावीन्यतेसाठी आणि नेतृत्वासाठी ओळखल्या जाणाऱ्या शौना पंड्या यांच्याबद्दल थोडं


तुझ्या उत्तुंग भरारी पुढे

गगन ही ठेंगणे भासावे

तुझ्या विशाल पंखाखाली

विश्व ते सारे वसावे..

शौना पंड्या ह्या पेशाने एक डॉक्टर आहेत. कधी रनवे मॉडेल, कधी न्यूरोसर्जिकल रेसिडेंट, उद्योजक, तायक्वांदो चॅम्पियन आणि आता नागरिक-वैज्ञानिक अंतराळवीर असलेल्या शॉना पंड्या या बहुगुणी व्यक्तिमत्वा बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

A little about Shauna Pandya, an internationally active pilot, medical officer, known for her innovation and leadership in science, entrepreneurship and technology

शॉना पंड्या ही एक वैमानिक आहे. तसेच बालरोग क्षेत्रात आणि हृदय शस्त्रक्रियेत त्या पारंगत आहेत. ह्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तर शौना नासा-जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणूनही कार्यरत आहेत. शॉना पंड्या सिलिकॉन व्हॅली येथील ‘सिव्हीगार्ड टेक्नॉलॉजीज’च्या सहसंस्थापिका आहेत. याच कंपनीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून त्या काम करतात. तसेच व्यवस्थापन आणि रुग्णांच्या ट्रायजसाठी स्मार्टफोन ट्रॅकिंग सिस्टीम ‘सिव्हिट्रीज’ च्या विकास कामात मदत करण्याचेही काम त्या करतात.

जन्म आणि बालपण :

शॉना यांना संगीत क्षेत्रातही खूप रस आहे. जेव्हा त्यांना मोकळा वेळ मिळतो, तेव्हा त्या गाणी गातात. तसेच पियानो आणि गिटारही वाजवतात. शॉना धर्मादाय संस्थांनाही भरपूर पाठिंबा देतात. शॉना पंड्याचे आई -वडील भारतीय वंशाचे नागरिक आहेत. त्यांचे आई वडील मुंबईतीलच आहेत पण शॉनाचा जन्म ब्रॅंडन, मॅनिटोबा येथे झाला होता. परंतु त्यांचे लहानपण अल्बर्टा येथे हसतखेळत आपल्या भावासोबत मजेत व्यतीत झाले.

शालेय जीवन :

शालेय जीवनात शॉनाला गणित आणि विज्ञान या विषयात विशेष रस होता. या विषयांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. याशिवाय त्या इतिहास आणि भाषिक विषयाच्याही चांगल्या विद्यार्थिनी होत्या. त्यांच्या मते ज्ञान मिळवण्यासाठी मनुष्याला कोणतेही बंधन नसते की मर्यादा. तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच त्यांनी अंतराळवीर बनण्याची स्वप्ने पहिली. ही स्वप्ने त्याच्या डोळ्यात दिवसरात्र त्यांना दिसू लागली. म्हणून हायस्कूल उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी अल्बर्टा विद्यापीठात न्यूरोसायन्समध्ये प्रवेश घेतला. विविध विषयातील ओढ त्यांना स्वस्थ बसू देत न्हवती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) करण्याचा निर्णय घेतला.

आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाच्या मास्टर प्रोग्रामसाठीचा अर्जही भरला. आणि सुदैवाने दोन्ही ठिकाणी त्या निवडल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय अभ्यासापासून एक वर्षाचा ब्रेक घेतला. आणि आंतरराष्ट्रीय अंतराळ विद्यापीठाच्या मास्टर प्रोग्रामचा एक भाग बनल्या. शॉना या सिटीझन अस्ट्रोनॉट कोर्स घेण्यापूर्वी जर्मनीतील युरोपियन अंतराळवीर केंद्रात वैद्यकीय सहाय्यक म्हणूनही काम करत होत्या.

शॉना पंड्या यांची कारकिर्द :

त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात, शॉना यांना वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. तसेच अंतराळवीर बनून संशोधन करण्यातही उत्सुकता होती. त्यांनी या क्षेत्रात अनेक शोधनिबंधही प्रकाशित केले आहेत. त्यांनी प्रामुख्याने अंतराळात वापरले जाणारे औषध आणि टेलि मेडिसीनमध्ये काम करण्यास रस दाखवला.

2009 मध्ये त्यांना अल्बर्टामधील विज्ञान, उद्योजकता आणि तंत्रज्ञानातील नावीन्यतेसाठी आणि नेतृत्वासाठी ASTech ‘लीडर ऑफ टुमॉरो’ या कॅटेगरी मध्ये फायनलिस्ट म्हणून घोषित करण्यात आले होते. अल्बर्टा विद्यापीठात ‘पीटर लुगीड स्कॉलर’ असे शीर्षक देऊन विद्यापीठातील पाच तेजस्वी विद्वानांना निवडले जाते. त्या पाच व्यक्तींपैकी शॉना पंड्याच्या नावाचाही समावेश होता.

2012 मध्ये त्यांना ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन पुरस्कार’ मिळाला. त्याच वर्षी त्यांना अल्बर्टा व्हेंचरच्या वतीने जाहीर झालेल्या ‘नेक्स्ट टेन’ प्रॉमिसिंग युवा नेतृत्व कौशल्यात परिपूर्ण असणाऱ्या व्यक्तिमध्ये त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. 2013 मध्ये तिने करिअर मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचा ‘प्राइड ऑफ स्ट्रॅथकोना अवॉर्ड’ जिंकला. त्याच्या पुढील वर्षी त्यांना ‘एडमॉन्टन डॉटर्स डे अवॉर्ड’ मिळाला. तायक्वांदोमध्ये त्या आता 17 वर्षांहून अधिक काळ सराव करत आहेत. त्या ब्लॅक बेल्ट आहे आणि बऱ्याच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी बक्षीस ही मिळवले आहे.

तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शॉना पंड्या यांची तुम्हाला आताशा पुरेशी माहिती मिळाली असणारच… पण तुम्हाला हे माहीत आहे का? की त्या मनोरंजन क्षेत्रातही कार्यरत आहेत. बऱ्याच ब्रँड साठी त्यांनी रॅम्प वॉक केले आहे. आणि ऑपेरा शोमध्ये गायले आहे. त्यांनी 10,000 लोकांसमोर भारताचे राष्ट्रगीतही गायले आहे.

ह्या सर्व क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या शॉना पंड्या यांना सामाजिक जबाबदाऱ्या पार पाडतानाही पाहिले गेलेय. नुकताच त्यांनी एक चॅरिटी कार्यक्रम ‘#itsoktohelp’ सुरू केला आहे. या कार्यक्रमामुळे दलित आणि निराधार लोकांना विविध संसाधने देऊन त्यांना मदत करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

शॉना यांचे प्रकल्प :

2016 मध्ये शॉना यांना दोन मोठ्या प्रकल्पांमध्ये काम करण्याची आणि शिकण्याची मोठी संधी मिळाली. ते दोन प्रकल्प खालीलप्रमाणे,

  1. अप्पर मेसोस्फीअरचे पोलर सबोर्बिटल सायन्स (PoSSUM)
  2. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण (PHEnOM) मधील शारीरिक, आरोग्य आणि पर्यावरणीय निरीक्षणे

PoSSUM चा उद्देश रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या ढगांची चाचणी घेणे हा होता. या प्रोजेक्ट मध्ये त्यांनी ढगांच्या निर्मितीचे कारण आणि त्यांच्याभोवती होत असणाऱ्या उड्डाणांच्या परिणामाचा अभ्यास केला. PHEnOM च्या उद्देशात मानवी शरीरशास्त्र (शरीरविज्ञान) चा अभ्यास समाविष्ट आहे. अश्या ह्या ऑल राउंडर शॉना यांना पुढील वाटचालीसाठी टीम फोकस इंडिया कडून लाख शुभेच्छा.

A little about Shauna Pandya, an internationally active pilot, medical officer, known for her innovation and leadership in science, entrepreneurship and technology

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात