वृत्तसंस्था
वाराणसी : ज्ञानव्यापी मशिदीच्या व्यास तळघरात हिंदू पक्षाला पुजेसाठी वाराणसी कोर्टाने परवानगी दिल्यानंतर ती परवानगी अलाहाबाद हायकोर्टाने कायम ठेवत अंजुमिया इंतेजामिया मशीद कमिटीला दणका दिला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिलाच, पण मशीद कमिटीच्या अर्जात सुधारणा करण्याचा सल्लाही दिला आहे Pooja will continue in the basement of Gnanavapi; Allahabad High Court hits out at Anjumia Intejamia Masjid Committee!!
ज्ञानवापी व्यास तळघरातील पूजेनंतर वाराणसीतील मुस्लिम समुदायाने मुस्लिम परिसरात बंद पुकारला त्या बंदला अंशतः प्रतिसाद मिळाला पण दरम्यानच्या काळात मुस्लिम पक्ष अलाहाबाद हायकोर्टात पोहोचला पण अलाहाबाद हायकोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला.
अलाहाबाद हायकोर्टानं काय म्हटलं?
ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील व्यास तळघरात पूजा करण्याची परवानगी देण्याच्या वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ज्ञानवापी मशीद समितीने अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली होती, या याचिकेवर अलाहाबाद हायकोर्टात आज सुनावणी झाली.
यावेळी हायकोर्टानं म्हटलं की, 17 जानेवारीच्या आदेशाला आव्हान दिल्याशिवाय काहीही करता येणार नाही. यावेळी हायकोर्टाने वाराणसी कोर्टाच्या निर्णयाला स्थगितीचा अर्जही नाकारला आणि मशीद समितीला 6 फेब्रुवारीपर्यंत अपिलात सुधारणा करण्यास सांगितले. अर्जात सुधारणा केल्यानंतरच या संदर्भात हायकोर्टात सुनावणी होणार आहे त्यामुळे तोपर्यंत ज्ञानवापीच्या तळघरात पूजाअर्चा सुरूच राहणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App