बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, नितीश कुमारांनी घेतली राज्यपालांची भेट!

या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जात आहे.


विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मंगळवारी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली, जी सुमारे 40 मिनिटे चालली. नितीश कुमार यांच्यासोबत मंत्री विजय चौधरीही उपस्थित होते. बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ५ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या दिवशी राज्यपाल संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील. बिहारच्या राजकारणात अनेक चर्चा सुरू असताना नितीश कुमार राजभवनात पोहोचले होते. यावरून तर्कवितर्क लढवले जात आहे.Political developments in Bihar speed up Nitish Kumar met the Governor



नितीश कुमार यांच्याबाबत अनेक प्रकारची विधानेही समोर आली आहेत. जेडीयू आणि आरजेडी वेगवेगळे मार्ग स्वीकारू शकतात, असे सांगण्यात आले. नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत सरकार स्थापन करू शकतात, अशीही चर्चा होती. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीत अमित शाह यांना नितीश कुमार यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी कोणाचा प्रस्ताव आल्यावर त्यावर विचार करू असं म्हणाले होते.

राज्यपाल आणि नितीश कुमार यांच्या भेटीदरम्यान माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे वक्तव्य समोर आले आहे. बिहारमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले होते. राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मी माझ्या सर्व आमदारांना 25 जानेवारीपर्यंत पाटण्यातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. जे होईल ते राज्याच्या हिताचे असेल. जय बिहार असं ते म्हणाले आहेत.

Political developments in Bihar speed up Nitish Kumar met the Governor

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub