Rajasthan : पुलवामातील शहीदांच्या विधवांच्या समर्थनासाठी भाजपा नेते, कार्यकर्ते उतरले रस्त्यावर

गेहलोत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, पोलिसांकडून लाठीमार

प्रतिनिधी

जयपूर : पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांच्या पत्नी आपल्या मागण्यांसाठी राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये सातत्याने आंदोलन करत आहेत. या शहीद जवानांच्या समर्थनार्थ बाहेर पडलेले भाजपाचे खासदार किरोडीलाल मीना यांना शुक्रवारी (१० मार्च) राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले, परंतु त्यांना दुखापतीमुळे जयपूरच्या सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजस्थानमध्ये हे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे. शहीदांच्या पत्नींच्या समर्थनासाठी आता जयपूरमध्ये भाजपा रस्त्यावर उतरली आहे. तर आंदोलन करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. Police detain Rajasthan BJP workers and leaders in Jaipur as They protest by widows of the jawans who lost their lives in Pulwama terror attack


Pulwama Widows Row : सचिन पायलट यांचा काँग्रेसला घरचा आहेर; मुख्यमंत्री अशोक गेहलोतवर निशाणा!


काँग्रेस लोकशाहीचा अपमान करत आहे –

राजस्थान भाजपा मुख्यालयापासून सुरू झालेल्या या आंदोलनात राजस्थान भाजपाचे अनेक बडे नेते दिसले. यादरम्यान पोलिसांनी अनेक नेत्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह राठोड म्हणाले की, आम्ही आजपासून आंदोलन सुरू केले आहे आणि ते पुढेही सुरूच ठेवू. राज्य सरकार ज्या प्रकारची वागणूक दाखवत आहे तो लोकशाहीचा अवमान आहे. आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहोत.

काय आहे प्रकरण? –

काल राजस्थान पोलिसांनी तीन सीआरपीएफ जवानांच्या विधवांना घटनास्थळावरून हटवल्यानंतर  पोलीस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. २८ फेब्रुवारीपासून तीन शहीदांच्या पत्नींनी नियमात बदल करण्याच्या मागणीसाठी सहा दिवसांपूर्वी बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या नातेवाईकांनाच नाही तर त्यांच्या मुलांनाही अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी मिळावी, अशी त्यांची मागणी होती. इतर मागण्यांमध्ये रस्ते बांधणे आणि त्यांच्या गावात शहीदांचे पुतळे बसवणे यांचा समावेश आहे.

सचिन पायलट यांचा मुख्यमंत्री गेहलोतांवर निशाणा –

राजस्थनचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट शुक्रवारी टोंक येथे होते. या घडामोडीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर ताशेरे ओढले. सचिन पायलट म्हणाले, “एखाद्याने स्वतःचा अहंकार आड येऊ देऊ नये. काही मागण्या असतील तर त्या पूर्ण करता येतील. आपण वीरांचे म्हणणे ऐकायलाही तयार नाही, हा संदेश देशात जाऊ नये. तुम्ही सहमत असाल किंवा असहमत (त्यांच्या मागण्यांशी) हे नंतरचे आहे. प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने हाताळता आले असते. पोलिसांनी त्याच्याशी केलेली वागणूक मान्य करता येणार नाही आणि त्याची चौकशी करून कारवाई व्हायला हवी.”

Police detain Rajasthan BJP workers and leaders in Jaipur as They protest by widows of the jawans who lost their lives in Pulwama terror attack

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात