राष्ट्रवादीच्या वाड्याला सुरूंग; जिल्हा बँक निवडणुकीत नगर नंतर जळगावातही राष्ट्रवादीला भाजपचा झटका!!

प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसची अवस्था एखाद्या उद्ध्वस्त जमीनदारासारखी झाली आहे. त्याला वाटते की हे मोठे शेत शिवार आपले होते. पण ते त्याचे उरलेले नाही. गावातला वाडा आपला आहे, पण तो ढासळतो आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार मध्यंतरी म्हणाले होते. पण काँग्रेसला डिवचणाऱ्या पवारांच्याच राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या वाड्यालाच सुरूंग लागून त्याचे चिरे एका पाठोपाठ एक ढासळत आहेत.BJP defeated NCP in nagar and jalgaon district cooperative banks Elections simultaneously

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने शिवाजीराव कर्डिले यांना निवडून आणून बहुमतातल्या राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला. तसाच धोबीपछाड आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतही दिला आहे. जळगाव जिल्हा बँकेत एकनाथ खडसे समर्थक राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवाराचा भाजपने पराभव केला आहे.



नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुद्धा अजितदादा पवारांनी लक्ष घातले होते. पण तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कळ फिरवली आणि विखे पाटील पिता पुत्र शिवाजीराव कर्डिले आणि बाकीचे भाजपचे नेते यांनी नगर जिल्हा बँकेत बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीला पराभूत करत अध्यक्षपदी शिवाजीराव कर्डिले यांना निवडून आणले. असाच प्रकार जळगाव सहकारी बँकेत घडला आहे. या बॅंकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार हे एका मताने निवडून आले आहेत. त्यांना शिवसेनेचे शिंदे गट, ठाकरे गट आणि भाजपचे समर्थन मिळाल्याचे सांगितले जात आहे.

 

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी आज सकाळी एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. त्यात रवींद्र पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवार जाहीर करण्यात आली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय पवारही निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. उपाध्यक्षपदासाठी शिंदे गटाकडून अमोल चिमणराव पाटील यांना संधी देण्यात आली होती.

राष्ट्रवादीत उमेदवारीवरून एकमत न झाल्याने अखेर निवडणूक घेण्यात आली. त्यात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र पाटील यांना १० मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार संजय पवार यांना ११ मते मिळाली. एक जादा मत घेत संजय पवार यांनी अध्यक्षपदासाठी बाजी मारली. प्रत्यक्षात महाविकास आघाडीकडे बहुमत होते, तरीही रवींद्र पाटील यांचा पराभव झाला. पाटील यांची उमेदवारी खडसे यांनी जाहीर केली होती. रवींद्र पाटलांचा पराभव हा एकनाथ खडसेंना मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.

या निवडणुकीत भाजप – शिंदे गट यांनी एकत्र येत खडसेंचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यांना ठाकरे गटाच्या एका संचालकाची मदत मिळाल्याची चर्चा आहे. त्याला अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही. दुसरीकडे, महाविकास आघाडीची मते फुटल्याचे उघड असून बहुमत पाठीशी असूनही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे नगरपाठोपाठ जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

शिवाय या निवडणुकीला एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीत वाढलेल्या वजनाची देखील पार्श्वभूमी आहे. एकनाथ खडसेंची कालच राष्ट्रवादीने विधान परिषदेतल्या गटनेतेपदी नियुक्ती केली आहे, तरी देखील एकनाथ खडसेंना जळगाव जिल्हा बँकेत आपला उमेदवार अध्यक्षपदावर निवडून आणता आला नाही याची चर्चा महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

BJP defeated NCP in nagar and jalgaon district cooperative banks Elections simultaneously

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात