VIDEO : पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा चूक; कर्नाटकात रोड शो दरम्यान वाहन ताफ्याकडे धावत सुटला तरूण अन्…

Karnataka modi rally

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विशेष प्रतिनिधी

PM Narendra Modi Security Breach In Karnataka: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रूटी पुन्ह एकदा समोर आली आहे. मोदींच्या कर्नाटक दौऱ्यादरम्यान आज (२५ मार्च) ही चूक दिसली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  PM Narendra Modi Security Breach In Karnataka

एएनआय या वृत्तसंस्थेने पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा व्हिडिओ शेअर केला आहे. पोलिसांच्या हवाल्याने या व्हिडिओला दुजोरा देण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दावणगेरे येथील रोड शो दरम्यान, जेव्हा मोदींचा ताफा रस्त्यावरून जात आहे, तेव्हा रस्त्याच्या कडेला उभा राहून नागरिक मोठ्याने ‘मोदी-मोदी’च्या घोषणा देत आहेत.  मात्र, त्याच दरम्यान एक तरुण वेगाने  धावत आणि ज्या रस्त्यावरून मोदींचा ताफा जात होता पोहचतो.   तो  मोदींच्या गाडीसमोर जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. तर यावेळी पंतप्रधान मोदी हात उंचावून जनतेला अभिवादन करताना दिसून येत आहे. पोलीस त्या तरूणाला पकडतात आणि पंतप्रधानांचा ताफा पुढे सरकतो. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे.

मे महिन्यात कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने शनिवारी (२५ मार्च) दावणगेरे येथे ‘विजय संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. भाजपच्या प्रचाराचा एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी कर्नाटकात पोहोचले आणि दावणगेरे येथे एका मोठ्या जाहीर सभेला संबोधित केले, त्याआधी त्यांनी रोड शो केला. तीन महिन्यांत दुसऱ्यांदा पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आढळून आल्या आहेत. जानेवारीत, कर्नाटकातील हुबळी पीएम मोदींच्या रोड शो दरम्यान एक मूल त्यांच्या जवळ आले होते.

PM Narendra Modi Security Breach In Karnataka

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात