G20 Leaders Summit : अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत जी -20 नेत्यांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उपस्थिती लावली. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित या परिषदेत तालिबानने सत्तेचा ताबा घेतल्यानंतर युद्धग्रस्त देशाच्या परिस्थितीवर व्यापक चर्चा झाली. PM Narendra Modi Participated In G20 Leaders Summit On Afghanistan On Tuesday
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अफगाणिस्तानमधील परिस्थितीबाबत जी -20 नेत्यांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही उपस्थिती लावली. व्हर्च्युअल माध्यमातून आयोजित या परिषदेत तालिबानने सत्तेचा ताबा घेतल्यानंतर युद्धग्रस्त देशाच्या परिस्थितीवर व्यापक चर्चा झाली.
अफगाणिस्तानवरील जी 20 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदींनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्रित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद तयार करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, याशिवाय अफगाणिस्तानमधील परिस्थितीत आवश्यक बदल घडवून आणणे कठीण होईल.
At G20 Extraordinary Summit, PM Modi stresses on preventing Afghan territory from becoming source of radicalisation, terrorism Read @ANI Story | https://t.co/OESz2yudoS#PMModi #G20 #Afghanistan pic.twitter.com/LhibHT6zX2 — ANI Digital (@ani_digital) October 12, 2021
At G20 Extraordinary Summit, PM Modi stresses on preventing Afghan territory from becoming source of radicalisation, terrorism
Read @ANI Story | https://t.co/OESz2yudoS#PMModi #G20 #Afghanistan pic.twitter.com/LhibHT6zX2
— ANI Digital (@ani_digital) October 12, 2021
मोदी म्हणाले की, आपण इतरांच्या तसेच आपल्या स्वतःच्या हक्कांची काळजी केली पाहिजे, इतरांच्या हक्कांना आपले कर्तव्य बनवले पाहिजे आणि ‘सम भाव’ आणि ‘मम भाव’ प्रत्येकासोबत ठेवला पाहिजे. ते म्हणाले की, राजकीय नफ्या -तोट्याच्या तराजूने तोललेल्या मानवाधिकारांचे राजकीय दृष्टीकोनातून गंभीरपणे उल्लंघन केले जाते.
मोदी म्हणाले की, असे वर्तन लोकशाहीसाठी खूप हानिकारक आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘सबका साथ, सबका विकास,’ हा मंत्र प्रत्येक व्यक्तीच्या मानवी हक्कांची हमी आहे. ते म्हणाले की, आमच्या प्रयत्नांचा गाभा प्रत्येक व्यक्तीचा सन्मान सुनिश्चित करणे आहे.
पंतप्रधानांनी या आभासी बैठकीच्या मंचावरून सांगितले की, अफगाणिस्तानसोबत भारताचे शतकांपूर्वीचे संबंध आहेत. भारताने अफगाणिस्तानसाठी 500 हून अधिक मदत प्रकल्प राबवले आहेत.
पीएम मोदी म्हणाले की, अफगाणिस्तानचे लोक उपासमारीचे आणि कुपोषणाचे बळी ठरत आहेत. अशा परिस्थितीत, जागतिक समुदायाने हे सुनिश्चित केले पाहिजे की अफगाणिस्तानच्या लोकांना मानवतावादी मदत त्वरित उपलब्ध व्हावी. ते म्हणाले की, अफगाणिस्तान जगासाठी कट्टरतावाद आणि दहशतवादाचे स्त्रोत बनू नये याचीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. यासह ते म्हणाले की, या भागात कट्टरपंथी दहशतवाद, ड्रग्ज आणि अवैध शस्त्रांची तस्करी यांच्यातील संबंध तोडण्यासाठी समान लढा मजबूत करण्याची गरज आहे.
PM Narendra Modi Participated In G20 Leaders Summit On Afghanistan On Tuesday
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App