वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चर्चा केली. भारतविरोधी घटकांवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी सुनक यांच्याकडे केली. यासोबतच ब्रिटनमध्ये आश्रय घेतलेल्या विजय मल्ल्या, नीरव मोदी यांचा मुद्दाही पंतप्रधानांनी उपस्थित केला. त्यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती देण्याची मागणी त्यांनी ब्रिटिश सरकारकडे केली.PM Modi’s discussion with Rishi Sunak: The issue of the attack on the Indian High Commission was raised, he said- take action against anti-India elements
या संभाषणावेळी मोदींनी सुनक यांना सप्टेंबरमध्ये होणाऱ्या G-20 परिषदेसाठी आमंत्रित केले. यावर सुनक यांनी जी-20 च्या भारताच्या अध्यक्षपदासाठी ब्रिटनच्या समर्थनाचा पुनरुच्चारही केला.
पंतप्रधान म्हणाले – भारतविरोधी घटकांवर कठोर कारवाई करा
पीएम मोदींनी सुनक यांना सांगितले की, सध्या ब्रिटनमध्ये काही भारतविरोधी घटक उघडपणे कायदा हातात घेत आहेत, जे चिंताजनक आहे. अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हायला हवी. याला उत्तर देताना सुनक यांनी ब्रिटनमधील भारतीय दूतावासांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर केली जाणार नाही, असे आश्वासन दिले. ते पुढे म्हणाले की, लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर झालेला हल्ला कधीही स्वीकारता येणार नाही.
आर्थिक मुद्द्यांवरही झाली चर्चा
पंतप्रधान मोदींनी सुनक यांच्याशी भारत आणि ब्रिटनमधील आर्थिक संबंधांवरही चर्चा केली. दोघांनी भारत-यूके रोडमॅप 2030 वर दीर्घ चर्चा केली. यासोबतच पीएम मोदी म्हणाले की, काही लोकांनी भारताचा सरकारी खजिना लुटला, ते ब्रिटनमध्ये लपले आहेत. अशा गुन्हेगारांचे लवकरात लवकर प्रत्यार्पण करा जेणेकरून त्यांना भारताच्या कायद्यानुसार शिक्षा होऊ शकेल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App