डॉ. मनमोहन सिंग यांच्या योगदानाची पंतप्रधान मोदींकडून राज्यसभेत प्रशंसा!!

PM Modi lauds ex-PM Manmohan Singh in Rajya Sabha farewell speech

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी देशासाठी अमूल्य योगदान दिले. त्यांनी देशाच्या राजकीय आणि आर्थिक व्यवस्थेला वळण लावण्यासाठी जे कष्ट घेतले त्यासाठी ते कायम संपूर्ण देशाच्या लक्षात राहतील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केल्या. राज्यसभेतील सदस्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदींनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या विषयी गौरवोद्गार काढून त्यांच्या कार्याला वंदन केले. PM Modi lauds ex-PM Manmohan Singh in Rajya Sabha farewell speech

डॉ. मनमोहन सिंग राज्यसभेतून आज निवृत्त झाले. त्यांच्याबरोबरच इतर अनेक सदस्यही निवृत्त झाले. त्यांच्या निरोप समारंभात पंतप्रधान मोदींनी या सर्व सदस्यांच्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी विशेषत्वाने मनमोहन सिंग यांचा उल्लेख केला.

विविध विधेयकांवर राज्यसभेतील मतदानाच्या वेळी मनमोहन सिंग व्हीलचेअर वर आले आणि त्यांनी आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर केला. बहुमत त्यांच्या बाजूने नव्हते. निकालही त्यांना माहिती होता, तरी देखील लोकशाही बळकट करण्यासाठी ते आपले योगदान देण्यास विसरले नाहीत, याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष वेधले. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दीर्घायुष्यासाठी पंतप्रधान मोदींनी कामना केली.

राजकीय विचारसरणी परस्परविरोधी असली, मतभेद असले तरी देखील एकमेकांच्या योगदानाचा आदर राखणे ही भारतीय संसदेची परंपरा आहे. ती परंपरा डॉ. मनमोहन सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाळली.

PM Modi lauds ex-PM Manmohan Singh in Rajya Sabha farewell speech

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात