PM Modi In Varanasi : पंतप्रधान मोदींचा काशी दौरा, 1500 कोटींच्या योजनांचे लोकार्पण, जाणून घ्या, यूपी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्व

PM Modi in Varanasi Visit Yogi Adityanath PM Narendra Modi Today To Inaugurate Various Projects

PM Modi in Varanasi : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पट मांडले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात महिन्यांनंतर यूपीमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपच्या बाजूने वातावरण निर्मितीची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी मोदींनी आपल्या संसदीय मतदारसंघ काशी येथे 1500 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या योजना सादर केल्या. यात आरोग्य, विकास, जल महामंडळ, ऊर्जा, सिंचन इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. PM Modi in Varanasi Visit Yogi Adityanath PM Narendra Modi Today To Inaugurate Various Projects


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : पुढील वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पट मांडले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात महिन्यांनंतर यूपीमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपच्या बाजूने वातावरण निर्मितीची तयारी सुरू केली आहे. गुरुवारी मोदींनी आपल्या संसदीय मतदारसंघ काशी येथे 1500 कोटींपेक्षा जास्त किंमतीच्या योजना सादर केल्या. यात आरोग्य, विकास, जल महामंडळ, ऊर्जा, सिंचन इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे.

काशीप्रमाणे पंतप्रधान मोदी दरमहा यूपीच्या काही जिल्ह्यांचा दौरा करतील आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील. याला 2022च्या विधानसभा निवडणुकीशी जोडले जात आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि भाजपसाठी यूपी राजकीयदृष्ट्याच नव्हे, तर राजकीय अजेंडा म्हणूनही अत्यंत महत्त्वाची आहे. यूपीची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी स्वत: आघाडी घेतली असून दौऱ्यांच्या माध्यमातून भाजपच्या बाजूने वातावरण निर्मितीची तयारी केली जात आहे.

कोरोनानंतर पंतप्रधानांची काशी भेट

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर पंतप्रधान प्रथमच काशीला पोहोचले. येथे ते पाच तासांचा वेळ देणार आहेत. या पाच तासांत पंतप्रधान काशीला दीड हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या योजना देत आहेत. यामध्ये ते 736.38 कोटींच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील आणि 417.68 कोटी खर्चाच्या सुमारे 84 प्रकल्पांची पायाभरणी करतील. यात ते 14 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट्स आणि रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करतील. महादेवाला प्रिय रुद्राक्षच्या धर्तीवर रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर बांधले गेले आहे.

बीएचयूच्या सर सुंदरलाल हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान 100 बेडच्या एमसीएच शाखेचे उद्घाटन करतील. याखेरीज पंचकोसी परिक्रमा मार्गाच्या 33 किमी रुंदीकरणाचे उद्घाटन केले जाईल. वाराणसी-गाझीपूर रोडवर 3 लेन उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. यासह आरोग्य सेवांशी संबंधित सर्व प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पीएम मोदी केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तांत्रिक संस्थेची पायाभरणी करतील. यावेळी वाराणसीच्या कारखियांव येथे आंबा आणि भाजी एकात्मिक पॅकहाऊसचा शिलान्यासही करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या डीम प्रोजेक्ट काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे काम जोरात सुरू आहे, ज्याचा ते आढावा घेतील.

यादरम्यान, सुमारे 6000 लोक बनारस हिंदू विद्यापीठाच्या आयआयटी स्पोर्ट्स ग्राउंडमध्ये पोहोचतील. यात शहरातील नामवंत लोक आणि कार्यकर्त्यांचा समावेश असेल. पंतप्रधान त्यांना संबोधित करतील. यासह पंतप्रधान येथे 150 कोरोना वॉरियर्सशीदेखील संवाद साधतील. राजघाट ते अस्सी घाटपर्यंत क्रूझ व्होट परिचालन सुरू करण्यात येणार आहे. अशाप्रकारे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काशी येथे एकूण 68 छोटी-मोठी उद्घाटने आणि पायाभरणीचे कार्यक्रम होणार आहेत.

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मोदींची भेट महत्त्वाची

भाजपाने केवळ काशीच नाही तर पूर्वांचलवरही पंचायत निवडणुकीत आपला घसरलेला प्रभाव कमविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पूर्वांचलचा राजकीय मूड दर पाच वर्षांनी बदलतो, यामुळे भाजप अत्यंत गंभीर झाली आहे. त्याच वेळी अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात 350 पारचा नारा दिला आहे, याकडेही भाजपचे लक्ष आहे.

आम आदमी पार्टीच्या धर्तीवर अखिलेश यादवांनी मोफत वीज आणि सरकारी नोकरीच्या आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. मायावतींनीही आपल्या पारंपरिक व्होट बँकेच्या जोरावर दणदणीत विजय मिळण्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी प्रियांका गांधीही यूपीच्या राजकीय लढाईत प्रवेश करत आहेत, त्यामुळे राज्यात 2022 च्या निवडणुकांचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.

यूपीचे सध्याचे राजकीय समीकरण पाहता स्वत: पंतप्रधान मोदी भाजपच्या वतीने राजकीय लढाईत उतरले आहेत. असा विश्वास आहे की, पंतप्रधान मोदी दरमहा यूपीच्या कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात विकास प्रकल्पांना भेट देऊन उद्घाटन करतील. जेणेकरून यूपीचे राजकीय वातावरण भाजपच्या बाजूने होऊ शकेल. त्याचबरोबर योगी आदित्यनाथही सतत दौरे करून वातावरण राखण्यातही व्यग्र झाले आहेत.

पूर्वांचल एक्स्प्रेस वेचे उद्घाटन

लखनऊला गाझीपूरला जोडणारा पूर्वांचल एक्स्प्रेस वे जवळजवळ तयार झाला आहे. 353 किमी लांब पूर्वांचल एक्स्प्रेसवे लखनऊ, बाराबंकी, अयोध्या, आंबेडकर नगर, अमेठी, सुलतानपूर, आझमगड, मऊ आणि गाझीपूरमार्गे जाईल. 15 ऑगस्टनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होईल, याचे निमंत्रण स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. पूर्वांचल एक्स्प्रेस वेचा शिलान्यासासह पंतप्रधान मोदींनी आझमगडमधून केला होता. आता उद्घाटन अशावेळी करण्यात येत आहे जेव्हा राज्यातील विधानसभा निवडणुकांना अवघा सात महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत या घडामोडी राजकीयदृष्ट्या फार महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

शेतकर्‍यांना खत प्रकल्पाची भेट

ऑक्टोबरपर्यंत गोरखपूर व आसपासचे शेतकऱ्यांना खत प्रकल्पाची भेट मिळणार आहे. गोरखपूर दौर्‍यावर स्वत: सीएम योगी यांनी सांगितले होते की, हे बांधकाम ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरनंतर त्याचे उद्घाटन करतील. 1990 मध्ये खत प्रकल्प बंद करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या आधीच्या कार्यकाळात त्याच्या पुनर्स्थापनेस मान्यता दिली होती. आता उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अगोदर पंतप्रधान मोदी खत प्रकल्पाचे उद्घाटन करतील यामुळे पूर्वांचलमधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गोरखपुरात एम्स आणि रेल्वे विद्युतीकरण

खतांप्रमाणेच पंतप्रधान मोदी गोरखपूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) चे उद्घाटन करतील. यापूर्वी मुख्यमंत्री योगी यांनी गोरखपूर दौर्‍यावेळी असेही सांगितले होते. पूर्वेचलच्या देवरिया, कुशीनगर, सिद्धार्थनगर येथे वैद्यकीय महाविद्यालये बांधली जात आहेत. पीएम मोदी यांच्या हस्ते या सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटनाची रूपरेषा तयार केली गेली आहे.

ईशान्य रेल्वे

70 टक्के रेल्वे मार्गांवर रेल्वे इंजिन इलेक्ट्रिक इंजिनमधून चालण्यास सुरुवात केली आहे, ज्यात सर्व मुख्य मार्गांचा समावेश आहे. सन 2023 पर्यंत रेल्वे बोर्डाने सर्व रेल्वेच्या विद्युतीकरणाचे लक्ष्य ठेवले आहे. गोरखपूर-आनंदनगर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत आनंदनगर-नौतनवान आणि आनंदनगर-बार्नी मार्गांचेही काम पूर्ण होईल. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्याचीही योजना आहे.

गंगा एक्सप्रेस वेची पायाभरणी

यूपीमधील मेरठ ते बलिया या गंगा एक्सप्रेसवेची पायाभरणी यूपी निवडणुकीपूर्वी झाली होती. गंगा एक्सप्रेससाठी भूसंपादनाचे काम जोरात सुरू आहे. यूपीच्या 20 जिल्ह्यांत जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यूपी सरकारने ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये या प्रकल्पाची पायाभरणी करण्याचा निर्णय घेतला असून ते पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहेत. याव्यतिरिक्त अनेक केंद्रीय योजना आहेत, ज्यांना पंतप्रधान मोदी ग्रीन सिग्नल देतील. 2022 च्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी या सर्व योना दिल्या जातील असा विश्वास आहे.

PM Modi in Varanasi Visit Yogi Adityanath PM Narendra Modi Today To Inaugurate Various Projects

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात