बिग बी अमिताभ बच्चन यांच्या घराबाहेर मनसेची पोस्टरबाजी, ‘मोठेपणा’ दाखवण्याचे आवाहन, जाणून घ्या प्रकरण

MNS Posters Outside BIG B amitabh Bachchan Bunglow Pratiksha

BIG B Amitabh Bachchan : बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन कायम चर्चेत असतात. पण यावेळी चर्चेचे कारण वेगळे आहे. मुंबईच्या जुहू येथे अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेर काही पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पोस्टर्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावले आहेत. MNS Posters Outside BIG B amitabh Bachchan Bunglow Pratiksha


विशेष प्रतिनिधी

मुंबई : बॉलीवूडचे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन कायम चर्चेत असतात. पण यावेळी चर्चेचे कारण वेगळे आहे. मुंबईच्या जुहू येथे अमिताभ बच्चन यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याबाहेर काही पोस्टर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हे पोस्टर्स महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावले आहेत.

बुधवारी रात्री लावलेल्या या पोस्टर्समध्ये अमिताभ बच्चन यांना मोठेपणा दाखवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वास्तविक, या पोस्टर्सच्या माध्यमातून असे आवाहन करण्यात आले आहे की, ज्ञानेश्वर रस्ता रुंदीकरणासाठी अमिताभ बच्चन यांनी मोठे मन दाखवावे आणि प्रशासनाला मदत करावी.

काय आहे वाद?

वास्तविक, बीएमसीतर्फे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याची एक भिंत तोडण्याची तयारी सुरू आहे. बीएमसीने 2017 मध्ये या प्रकरणात अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठविली होती, परंतु त्यांनी त्यास प्रतिसाद दिला नाही.

सध्या येथे रस्ता 45 फूट रुंद आहे. त्यास 60 फूट रुंदीकरणाची तयारी आहे, पण त्यासाठी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याची एक भिंत मध्यभागी येत आहे.

अरुंद रस्त्यामुळे येथे दररोज वाहतुकीची कोंडी होते. या विषयावर जेव्हा बीएमसीने अमिताभ बच्चन यांना नोटीस पाठविली होती, तेव्हा त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती, यामुळे हे काम थांबविण्यात आले होते. पण आता पुन्हा काम सुरू करण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. अशा परिस्थितीत आता ही भिंत तोडण्याची तयारी पालिकेने चालवली आहे.

MNS Posters Outside BIG B amitabh Bachchan Bunglow Pratiksha

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात