आपण एकत्रितपणे जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीला प्रोत्साहन देऊया
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : PM Modi डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्पसोबतचे फोटो शेअर करताना पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर म्हटले की, ‘ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. आपण आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करू या. PM Modi
तसेच मोदींनी लिहिले की, ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचे हार्दिक अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-यूएस व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याचे नूतनीकरण करण्यास उत्सुक आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत, सुरुवातीच्या मतमोजणीत ट्रम्प डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यापेक्षा पुढे राहिले. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांनी 277 जागा जिंकल्या आहेत. तर कमला हॅरिस यांना 226 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 270 आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App