तबब्ल पाच कोटींची मागितलीआहे खंडणी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : Baba Siddiqui राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सिद्दीकी हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराला अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन केल्याचे सांगण्यात येत आहे. फोन करणाऱ्याने त्यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.Baba Siddiqui
महाराष्ट्राचे माजीमंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सध्या पोलीस या प्रकरणाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी डझनभर जणांना अटक केली आहे. यासोबतच याप्रकरणी आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासेही झाले आहेत.
दरम्यान, आरोपींबाबत आणखी एक नवीन दावा करण्यात आला आहे. यासोबतच या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एका प्रत्यक्षदर्शीला धमकीचा फोन आला होता. यानंतर खार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने साक्षीदाराकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App