पंतप्रधान मोदी पुन्हा सर्वाधिक रेटिंगसह जागतिक नेत्यांच्या यादीत अग्रस्थानी

सर्वेक्षणात माहिती आली समोर; जाणून घ्या जगभरातील अन्य प्रमुख नेत्यांना काय रेटींग मिळाले आहे?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी केवळ देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्वेक्षणात मोदींना दिलेल्या रेटिंगवरून याचा अंदाज लावता येतो. सर्वेक्षणानुसार, पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा जागतिक नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहेत, त्यांना 76 टक्के मान्यता रेटिंग मिळाली आहे. PM Modi again tops the list of world leaders with the highest ratings

अमेरिकन कन्सल्टन्सी फर्मच्या ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग ट्रॅकर’नुसार, भारतातील 76 टक्के लोक मोदींचे नेतृत्व स्वीकारतात, तर 18 टक्के लोकांना त्यांचे नेतृत्व आवडत नाही. तर सहा टक्के लोकांनी यावर कोणतेही मत दिले नाही.



रेटिंगच्या बाबतीत पंतप्रधान मोदींच्या जवळचे कोणी नाही. मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे सर्वेक्षणात दुसऱ्या स्थानावर आहेत, त्यांना ६६ टक्के रेटिंग मिळाले आहे. तिसर्‍या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट यांना 58 टक्के रेटिंग मिळाली आहे. मागील सर्वेक्षणांमध्येही पंतप्रधान मोदी हे जागतिक रेटिंगमध्ये अव्वल स्थानावर होते, तर इतर मोठ्या जागतिक नेत्यांचे मान्यता रेटिंग खूपच कमी आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना ३७ टक्के, तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना ३१ टक्के आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना २५ टक्के मते मिळाली आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना सर्वेक्षणात केवळ 24 टक्के रेटिंग मिळाले आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदींचे सर्वोच्च रेटिंग समोर आले आहे. 2024 मध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पक्षासाठी ही मोठी चालना म्हणून पाहिले जात आहे.

PM Modi again tops the list of world leaders with the highest ratings

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात