शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोदी सरकारने पीएम ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मोदी सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे.PM Kisan Tractor Yojana: The government is giving 50% subsidy on the purchase of tractors, so can apply
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपला देश शेतीप्रधान देश आहे.अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कठोर परिश्रम घेत आहे. तसे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना चालवत आहेत.ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत आहे.शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मोदी सरकारने पीएम ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये मोदी सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देत आहे.
पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक ६००० रुपये जमा केले जातात.शेतकर्यांनाही शेतीसाठी अनेक प्रकारच्या यंत्रांची गरज असते.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्र सरकार ट्रॅक्टर खरेदीवर सबसिडी देत आहे.
शेतकऱ्यांना ट्र्रॅक्टर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने सब्सिडी सुरू केली आहे. ज्याअंतर्गत कोणत्याही कंपनीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना निम्म्या किंमतीत खरेदी करता येणार आहे. उर्वरित रक्कम सरकारकडून सब्सिडी म्हणून मिळते. याशिवाय राज्य सरकारे देखील ट्रॅक्टर्सवर २० ते ५० टक्क्यांपर्यंत सब्सिडी देत असते.
१) ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला कृषी विभाग किंवा लोकसेवा केंद्रात जावे लागेल. २)तेथे गेल्यानंतर तुम्हाला पंतप्रधान ट्रॅक्टर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. ३) त्यानंतर, अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल आणि विनंती केलेली कागदपत्रे फॉर्मसह संलग्न करावी लागतील. ४) त्यानंतर, ते कृषी विभाग किंवा लोकसेवा केंद्रात सादर करावे लागेल, जे आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण करेल. ५) पीएम ट्रॅक्टर योजनेसाठी CSC केंद्रावर जाऊन ऑनलाईन अप्लाय करता येईल.
१) केवळ गरीब शेतकरीच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. २) अन्य सबसिडी यंत्राशी जोडलेला शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकत नाही. ३) अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे. ४) या योजनेअंतर्गत शेतकरी फक्त एका ट्रॅक्टरसाठी अर्ज करू शकतो. ५) अर्जदार शेतकऱ्याकडे लागवडीयोग्य जमीन असावी आणि त्याने 7 वर्षांपासून कोणतेही ट्रॅक्टर खरेदी केले नसावे.
१)अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो २)आधार कार्ड ३)बँक खाते पासबुक ४)ओळखपत्र ५) जमिनीशी संबंधित कागदपत्रे ६) मोबाईल नंबर
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App