धावत्या रेल्वेत महिलेवर सामूहिक बलात्कार केला, नराधमांनी प्रवाशांनाही लुटले, 4 जणांना अटक


लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका महिलेसोबत कथित सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर चार जणांना अटकही करण्यात आली असून इतर चार जणांचा शोध सुरू आहे. त्याच वेळी या प्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितले की, जवळजवळ 8 जण ट्रेनमध्ये चढले होते. त्यांनी आधी दरोडा टाकला आणि मग पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतर 4 जणांचा शोध घेतला जात आहे. Four persons arrested for alleged gangrape with a woman onboard Lucknow-Mumbai Pushpak Express


वृत्तसंस्था

मुंबई : लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये एका महिलेसोबत कथित सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. त्यानंतर चार जणांना अटकही करण्यात आली असून इतर चार जणांचा शोध सुरू आहे. त्याच वेळी या प्रकरणात रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी सांगितले की, जवळजवळ 8 जण ट्रेनमध्ये चढले होते. त्यांनी आधी दरोडा टाकला आणि मग पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेवर बलात्कार केला. या प्रकरणात 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि इतर 4 जणांचा शोध घेतला जात आहे.

सशस्त्र दरोडेखोर चालत्या ट्रेनमध्ये घुसले

शुक्रवारी अनेक सशस्त्र दरोडेखोर एक्सप्रेसमध्ये चढले होते. या नराधमांनी प्रवाशांना लुटले आणि त्यांच्या मौल्यवान वस्तू काढून घेतल्या. या घटनेमुळे प्रवासी खूप घाबरले आहेत. त्याचवेळी प्रवाशांना लुटल्यानंतर आरोपींनी एका 20 वर्षीय महिलेवर बलात्कार केला. घटना घडल्यानंतर गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले. त्याचवेळी घटनेची माहिती मिळताच कल्याण रेलवे पोलिसांनी दरोडा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.



काय म्हणाले पोलीस?

याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “जीआरपी मुंबईने भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत सीआर क्रमांक 771/21 यू/एस 395, 397, 376 (डी), 354, 354 (आयपीसी आर/डब्ल्यू 137 आणि 153 भारतीय रेल्वे अधिनियमांतर्गत कल्याणमध्ये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी (औरंगाबाद रेल्वे जिल्हा) मध्ये स्लीपर बोगी डी -2 मध्ये चढले आणि रात्री घाट परिसरातून गुन्ह्यांना सुरुवात केली. जेव्हा ट्रेन आमच्या कार्यक्षेत्रात कसारामध्ये पोहोचली तेव्हा प्रवाशांनी मदतीसाठी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अधिकारी आणि कर्मचारी पथकाने तत्काळ प्रतिसाद दिला. आम्ही आतापर्यंत चार आरोपींना पकडले आहे. डीसीपी आणि गुन्हे शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत आहेत. एकूण चोरी झालेली मालमत्ता अंदाजे 96,390 रुपयांची (बहुतेक मोबाईल) आहे. त्यापैकी आम्ही 34200 रुपयांची मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आम्ही तपासावर लक्ष ठेवून आहोत.

Four persons arrested for alleged gangrape with a woman onboard Lucknow-Mumbai Pushpak Express

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात