
PLI scheme and mega textile parks : वस्त्रोद्योगाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार लवकरच दोन निर्णय घेणार आहे. वस्त्रोद्योग सुधारण्यासाठी पीएलआय योजना आणि मेगा टेक्सटाईल पार्क योजना लवकरच लागू केली जाईल, असे वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. 7 मेगा टेक्सटाईल पार्क तयार करण्याची सरकारची योजना आहे. पीयूष गोयल हे देशाचे वाणिज्य मंत्रीदेखील आहेत. देशातील टॉप टेक्सटाईल निर्यातदारांना संबोधित करताना त्यांनी हे जाहीर केले. PLI scheme and mega textile parks scheme for textile industry soon says piyush goyal
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : वस्त्रोद्योगाला स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार लवकरच दोन निर्णय घेणार आहे. वस्त्रोद्योग सुधारण्यासाठी पीएलआय योजना आणि मेगा टेक्सटाईल पार्क योजना लवकरच लागू केली जाईल, असे वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आज सांगितले. 7 मेगा टेक्सटाईल पार्क तयार करण्याची सरकारची योजना आहे. पीयूष गोयल हे देशाचे वाणिज्य मंत्रीदेखील आहेत. देशातील टॉप टेक्सटाईल निर्यातदारांना संबोधित करताना त्यांनी हे जाहीर केले.
पीयूष गोयल म्हणाले की, हे कापड व्यापारी जगातील भारताचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. मी वस्त्र निर्यातदार आणि उत्पादकांना गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून जागतिक बाजारपेठेत आमचे योगदान आणखी वाढेल. जर आपण सर्वांनी ठरवले तर कापड निर्यात साडेसात लाख कोटी ($ 100 अब्ज) पर्यंत नेणे कठीण नाही. गोयल म्हणाले की, हे क्षेत्र जास्तीत जास्त रोजगार निर्माण करते. घरोघरी, गावोगावी लोक यात सामील होऊ शकतात. महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी यापेक्षा चांगले क्षेत्र नाही.
यदि हम सभी तय कर लें तो टैक्सटाइल एक्सपोर्ट को साढ़े सात लाख करोड़ तक ले कर जाना मुश्किल नही है।
यह क्षेत्र सबसे अधिक रोजगार उत्पादन करता है, घर घर, गांव गांव के लोग इससे जुड़ सकते हैं, महिलाओं को आत्मनिर्भर बनाने, और सशक्त करने का इससे बेहतर कोई सैक्टर नही है : @PiyushGoyal
— Piyush Goyal Office (मोदी का परिवार) (@PiyushGoyalOffc) September 3, 2021
$ 100 अब्ज निर्यातीचे लक्ष्य कठीण नाही
चालू आर्थिक वर्षात सरकारने 44 अब्ज डॉलर्सचे कापड निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गोयल म्हणाले की, या वर्षी आम्ही हे लक्ष्य साध्य करू आणि पुढील पाच वर्षांत देशाची कापड निर्यात $100 अब्जांपर्यंत वाढेल. वस्त्रोद्योगाला गती देण्यासाठी सरकार अनेक देशांशी मुक्त व्यापार करार करत आहे. यामध्ये इंग्लंड, युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांचा समावेश आहे.
PLI योजना
पीयूष गोयल म्हणाले की, पीएलआय योजना तांत्रिक वस्त्र आणि मानवनिर्मित फायबर विभागासाठी लवकरच सुरू केली जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशांतर्गत उत्पादन आणि निर्यातीत मदत होईल. या कार्यक्रमात त्यांनी टेक्सटाईल पार्कची माहितीही दिली.
सात टेक्सटाईल पार्क
ते म्हणाले की, मेगा इन्व्हेस्टमेंट टेक्स्टाईन पार्क स्कीम (MITRA स्कीम) अंतर्गत, पुढील तीन वर्षांत सात पार्क तयार केली जातील. लवकरच त्याला मंजुरी मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मित्रा योजनेची घोषणा केली होती.
PLI scheme and mega textile parks scheme for textile industry soon says piyush goyal
महत्त्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडमध्ये दहशतवादी हल्ला : इसिसच्या जिहादीने 6 जणांना चाकूने भोसकले, 3 जण गंभीर; पोलिसांच्या गोळीबारात हल्लेखोर ठार
- काबूलमध्ये ‘तालिबान सरकार’ स्थापनेचे होर्डिंग्ज, हक्कानी नेटवर्कलाही सत्तेत स्थान, मुल्ला बरादर करणार नेतृत्व
- National Asset Monetization Pipeline : सरकारी मालमत्तांतून निधी उभा करण्याविरोधात कोणाकडेही अर्थपूर्ण प्रतिवाद नाही; संजीव संन्याल यांचे चिदंबरम यांना प्रत्युत्तर
- तालिबानविरोधात रस्त्यावर उतरल्या महिला; शिक्षण आणि रोजगाराचा अधिकार देण्याची मागणी
- ममता सरकारला मोठा धक्का, सर्वोच्च न्यायालयाने डीजीपी नियुक्तीची फेटाळली याचिका