वृत्तसंस्था
चेन्नई : तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात आहे. दोन दिवसांत संघाच्या तीन कार्यकर्त्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकल्याची चर्चा आहे. रविवारी सकाळी काही लोकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यकर्त्याच्या घरावर पेट्रोल भरलेल्या बाटल्या फेकल्या.Petrol bomb thrown at RSS worker’s house in Tamil Nadu 6 PFI and SDPI in police custody, Muslim organizations protest
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. ज्वलनशील पदार्थाने भरलेल्या दोन बाटल्या घरावर फेकल्या गेल्या, त्या दाराबाहेर पडल्या, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांना आग लागली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हे प्रकरण सालेमच्या अम्मापेट येथील आहे.
पीएफआय आणि एसडीपीआयचे 6 जण ताब्यात
पोलिसांनी पीएफआय आणि एसडीपीआयच्या 6 जणांना ताब्यात घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. यावेळी सालेमचे पोलिस आयुक्त नजमुल होडा आणि उपायुक्त एम मदासामी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. त्याचवेळी मुस्लिम संघटनांच्या 100 हून अधिक कार्यकर्त्यांनी 6 जणांना ताब्यात घेतल्याच्या विरोधात निदर्शने केली. त्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालून संताप व्यक्त केला. सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस ठाण्याभोवती अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सुरक्षा वाढवली
संघ कार्यकर्त्याच्या घराजवळ लावलेल्या सीसीटीव्हीमधून पोलिसांना आरोपीचा व्हिडिओ मिळाला. व्हिडिओमध्ये काही लोक आरएसएस कार्यकर्त्याच्या घरावर बाटल्या फेकताना दिसत आहेत. या घटनेनंतर संघ कार्यकर्त्याच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासोबतच तामिळनाडू पोलिसांनी हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांविरोधात एनएसए अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांतील तिसरी घटना.
याआधी शनिवारी संध्याकाळी तमिळनाडूतील मदुराई येथील पट्टनदी परिसरात अशीच एक घटना समोर आली होती. येथे आरएसएस नेत्याच्या घरावर अज्ञात व्यक्तीने तीन पेट्रोल बॉम्ब फेकले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. शनिवारी चेन्नईजवळील तांबरम येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याच्या घरावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App