पवारांना या वयात कौटुंबिक समस्या सोडवता आली नाही, ते महाराष्ट्राच्या समस्या काय सोडवणार??; मोदींकडून नवे वाभाडे!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शरद पवारांना या वयात त्यांची कौटुंबिक समस्या सोडवता आली नाही, ते महाराष्ट्राच्या समस्या काय सोडवणार?? त्यामुळे त्यांच्याबद्दल महाराष्ट्रात सहानुभूती बिलकुल नाही, उलट संताप आहे, अशा परखड शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शरद पवारांवर नव्याने शरसंधान साधले. Pawar could not solve family problems at this age

पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी पवारांनाच उद्देशून “भटकती आत्मा” अशी टीका केली होती. त्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड गदारोळ उठला. आरोप प्रत्यारोप झाले. परंतु मोदी यांनी पवारांवर शरसंधान साधणे सोडले नाही. टीव्ही 9 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत शरद पवारांचा संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्यावर सविस्तर उत्तर दिले.

शरद पवारांना महाराष्ट्रात सहानुभूती मिळेल का??, या प्रश्नावर बोलताना मोदी म्हणाले, त्यांना कशी सहानुभूती मिळेल??, सहानुभूती तर भाजपच्या बाजूने आहे. मूळात शरद पवारांची समस्या ही राजकीय नाही. ती कौटुंबिक समस्या आहे. आपल्या पक्षाची धुरा काम करणाऱ्या पुतण्याच्या हातात सोपवायची की आपल्याला मुलगी आहे म्हणून तिच्या हातात सोपवायची, ही त्यांची कौटुंबिक समस्या आहे आणि शरद पवारांना या वयामध्ये ती साधी समस्या सोडवता आलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला वाटते, पवार साधी कौटुंबिक समस्या सोडवू शकत नाहीत, तर महाराष्ट्राच्या समस्या काय सोडवतील??, त्यामुळे शरद पवारांविषयी महाराष्ट्रात सहानुभूती नाही तर राग आहे.

याच मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्या संदर्भात देखील सविस्तर भाष्य केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :

  • औरंगजेबाचा सन्मान आणि सावरकरांचा अपमान करणाऱ्यांबरोबर उद्धव ठाकरे बसले. त्यांनी सत्ता भोगली ही त्यांची चूक आहे. बाळासाहेबांनी कधीच अशा लोकांबरोबर तडजोड केली नसती कारण बाळासाहेबांचे विचारच पूर्ण वेगळे होते. शिवसैनिकांसाठी बाळासाहेब कायम जगले. बाळासाहेबांनी माझ्यावर अतिशय प्रेम केले. त्यांचे ऋण मी विसरू शकणार नाही. भाजपचे आमदार जास्त असताना देखील शिवसेनेचा मुख्यमंत्री गेला की आमची बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे.
  • उद्धव ठाकरे हे काही माझे वैयक्तिक शत्रू नाहीत. बाळासाहेबांचे पुत्र या नात्याने त्यांच्याशी माझे परिवाराशी संबंध आहेतच. ते जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांची तब्येत बरी नव्हती तेव्हा रश्मी वहिनींशी मी नियमित संपर्कात होतो. फोनवरून त्यांच्या तब्येतीची चौकशी करत होतो. एकदा स्वतः उद्धव ठाकरेंनीच फोनवर मला सल्ला विचारला तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला दिला. आजही उद्धव ठाकरे संकटात सापडले तर मी परिवाराच्या नात्याने मदत करणारा पहिला व्यक्ती असेन, पण ही बाब फक्त परिवार आणि व्यक्तीपुरतीच मर्यादित राहील राजकारणाशी त्याचा संबंध असणार नाही.
  • महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांची शिवसेना आज भाजपसोबत आहे आणि बाळासाहेबांना श्रद्धांजली म्हणूनच आम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री केला आहे.
  •  शरद पवारांना महाराष्ट्रात सहानुभूती मिळण्याची शक्यता नाही. मूळात शरद पवारांचा सहानुभूतीचा मुद्दा राजकीय दृष्ट्या चूक आहे. कारण शरद पवारांचा मामला हा सुद्धा कौटुंबिक मामला आहे. पक्षाची धुरा काम करणाऱ्या पुतण्याकडे सोपवायची की आपल्याला मुलगी आहे म्हणून तिच्याकडे सोपवायची, हा तो मामला आहे. शरद पवारांना या वयात देखील तो मामला सोडवता येत नाही, हा त्यांच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी सहानुभूती असण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये राग जास्त आहे, अशा परखड शब्दांत पंतप्रधान मोदींनी शरद पवारांच्या राजकारणाचे वाभाडे काढले.

Pawar could not solve family problems at this age

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात