शिस्तपालन समितीच्या शिफारशीवरून जम्मू-काश्मीर भाजपचे कार्याध्यक्ष शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले. Pawan Khajuria
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : भाजपने जम्मू-काश्मीरचे उपाध्यक्ष पवन खजुरिया यांना पक्षातून निलंबित केले आहे. तिकीट न मिळाल्याने पवन यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आहे. शिस्तपालन समितीच्या शिफारशीवरून जम्मू-काश्मीर भाजपचे कार्याध्यक्ष शर्मा यांनी निलंबनाचे आदेश दिले.
जम्मू-काश्मीरमधील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पवन खजुरिया यांना पक्षाने तिकीट दिले नाही. यामुळे ते चिडले होते. त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता, यानंतर भाजपने शिस्तभंगाची कारवाई केली. Pawan Khajuria
Health System : आरोग्य यंत्रणेचे जाळे अधिक घट्ट करण्यावर शासनाचा भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पठानिया यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरोधात प्रचार केल्याचा आरोप खजुरिया यांनी केला होता. खजुरिया म्हणाले, मी 35 वर्षे पक्षाची सेवा केली आहे. हे मी सर्व गोष्टींच्या वर ठेवले आहे. मात्र पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये निराशा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. Pawan Khajuria
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more