नरेंद्र मोदी 21 सप्टेंबरला तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) आणि कमला हॅरिस यांच्यात मुख्य लढत आहे. दोन्ही नेते निवडणुकीचा जोरदार प्रचार करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले होते. ट्रम्प म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी अमेरिकेतील मिशिगन शहरात पोहोचले. येथे ते एका निवडणूक कार्यक्रमात अमेरिकन उद्योगपतींना संबोधित करत होते. पुढील आठवड्यात नरेंद्र मोदींना भेटणार असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. मात्र हे दोन्ही नेते अमेरिकेत कुठे भेटणार हे ट्रम्प यांनी सांगितले नाही. नरेंद्र मोदी 21 सप्टेंबरला तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
अमेरिकन निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदींचे नाव घेणे ही ट्रम्प यांची रणनीती असू शकते आणि यामागे दोन मोठी कारणे आहेत. पहिला- पंतप्रधान मोदींशी जवळीक दाखवून ट्रम्प अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून भारतीय समुदायाच्या मतदारांचा निवडणुकीत ट्रम्प यांच्याकडे कल वाढेल. याशिवाय दुसरे मोठे कारण म्हणजे भारतीय बाजारपेठ. भारत ही मोठी बाजारपेठ आहे. अमेरिकन उद्योगपतींना भारतीय बाजारपेठेत यायचे आहे. अशा परिस्थितीत, पीएम मोदींशी मैत्री व्यक्त करून, ते उद्योगपतींना हे पटवून देऊ शकतील की पीएम मोदी त्यांचे मित्र आहेत आणि सत्तेत आल्यानंतर ट्रम्प त्यांच्यासाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे सोपे करतील.
21 सप्टेंबरपासून पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा सुरू होत आहे. मोदी येथे वार्षिक क्वाड समिटमध्ये सहभागी होतील. या काळात पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करणार आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान मोदी 22 सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाच्या सभेला संबोधित करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more