Paris Olympics : विनेशसाठी सर्व पर्याय तपासा; PM मोदींचा भारतीय ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा पी. टी. उषांना फोन


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केवळ 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ऑलिंपिक फायनल मध्ये अपात्र ठरवली गेली. त्यामुळे संपूर्ण भारतभर निराशा पसरली. विनेशने आपल्या कामगिरीने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातली होती, पण अंतिम सामन्यापूर्वीच तिचे वजन 100 ग्रॅमने जास्त भरल्याने तिला इंटरनॅशनल ऑलिंपिक समितीने फायनल खेळण्यासाठी अपात्र घोषित केले. त्यामुळे भारतीय जनमानसात निराशा पसरली. Paris Olympics in Vinesh phogat disqualified

काँग्रेस आणि भाजप यांनी या मुद्द्यांवरून राजकारण केले. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विनेशचे मनोधैर्य टिकवून ठेवण्याचे ट्विट केले. त्याच बरोबर मोदींनी भारतीय ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांना फोन करून आंतरराष्ट्रीय नियमानुसार विनेशसाठी सर्व पर्याय तपासायची सूचना केली. आवश्यक ती सर्व पावले उचला. विनेशच्या खेळासाठी उपयोग होणार असेल, तर आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीकडे भारताचा तीव्र निषेध नोंदवा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. टी. उषा यांना दिल्या.

PM नरेंद्र मोदी यांनी ट्विट लिहिले, “विनेश, तू चॅम्पियन्समध्ये एक चॅम्पियन आहेस!! तू भारताचा अभिमान आहेस आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणा आहेस. आजचा धक्का आपणा सगळ्यांना दुखावला. शब्दांनी भावना व्यक्त करता याव्यात अशी माझी इच्छा आहे. मी ज्या निराशेचा अनुभव घेत आहे, ते मला माहिती आहे की तू आव्हाने स्वीकारत आहेस.

ट्विट करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिंपिक समितीच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांना फोन करून विनेश फोगाटच्या अपात्रतेविषयी तपशीलवार माहिती जाणून घेतली.

Paris Olympics in Vinesh phogat disqualified

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात